छत्रपती संभाजीनगर

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण

CD
छायाचित्र स्पर्धेत शासकीय आयटीआयला द्वितीय क्रमांक परभणी, ता. ८ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने आयोजित छायाचित्र स्पर्धेत येथील गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने यश मिळविले. संस्थेने प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयोजित स्पर्धेत संस्थेतील कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेली छायाचित्रे कलात्मक, कल्पक आणि सृजनशीलतेचा उत्तम नमुना ठरली. तंत्रज्ञान आणि कलेचा सुरेख संगम साधत सादर केलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांमुळे परभणीच्या संस्थेला प्रादेशिक स्तरावर द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला. उल्लेखनीय यशाबद्दल व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे ‘कृतज्ञता प्रमाणपत्र’ तसेच तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक संस्थेला देण्यात आले. स्पर्धकांना गटनिदेशक सुनील वाकोडकर, पेंटर विभागप्रमुख प्रकाश बनाटे, तासिका निदेशक कृष्णा उकंडे आणि अमोल टाके यांनी मार्गदर्शन केले. यशाबद्दल प्राचार्य विकास आडे, प्रबंधक रामकिशन देशमुख, कार्यालयीन अधीक्षक विष्णुपंत कमळकर, गोपाळ घायाळ, भगवान काळे, मधुकर ब्राह्मणे, भाऊराव वाणी, सुशील वाकोडकर, संदीपान वाघमारे, रमाकांत लोखंडे, संतोष नालंदे, गणेश ठिगळे, श्रीकांत टिपरसे, प्रशांत भुसारे, संतोष चौधरी, उषा गवई, प्रज्ञा निकम, राधिका कुलकर्णी आणि प्रतीक्षा बालटकर यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT