छत्रपती संभाजीनगर

देवस्थानची जमीन हडपणाऱ्या कोणाचे अभय?

CD
देवस्थानची जमीन हडपणाऱ्यांना कोणाचे अभय? जाधवाडीतील बेकायदा प्लॉटिंग ः पोलिसांपुढे महापालिका हातघाईला जाधववाडी, ता. १६ : जाधववाडी परिसरातील श्रीराम मंदिर संस्थान व बालाजी मठाच्या वर्ग-२ च्या ४१ एकर जमिनीवरील अनधिकृत प्लॉटिंग आणि भूखंड विक्री प्रकरणी दीड महिन्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. महापालिका अधिकारी कागदपत्रांची पूर्तता करताना हातघाईला आली असून, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाची पोलिस वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधववाडी येथील बाजार समितीसमोरील श्रीराम मंदिर संस्थान आणि बालाजी मठाच्या गट क्रमांक १२४ व १२५ मधील ४१ एकर देवस्थान जमिनीवर अनधिकृत प्लॉटिंग करून भूखंडांची विक्री करण्यात आली. श्री रामानंद बिल्डरचे मुकुंद कुलकर्णी यांनी पाच ते सात हजार रुपये प्रतिचौरस फूट दराने बॉण्डवर भूखंड विकल्याची माहिती समोर आली होती. यातील ८० ते ८५ टक्के भूखंडांची विक्री झाल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर ३० सप्टेंबरला महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करून प्लॉटिंग उद्ध्वस्त केली. मात्र, संबंधितांवर गुन्हा नोंद झाला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी वारंवार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत. पण पंचनाम्यामध्ये त्रुटी आहेत. कागदपत्र अर्धवट आहेत, अशी कारणे देऊन गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हाताळले जात असून, त्यांच्या आदेशाची वाट पोलिस ठाण्याचे अधिकारी पाहत आहेत. त्यामुळे कोणता वरिष्ठ अधिकारी देवस्थानची जमीन बेकायदा विक्री करणाऱ्या भूमाफियांना पाठीशी घालत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT