छत्रपती संभाजीनगर

धाराशिवच्या बासरी वादकाच्या कलेचे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून कौतुक

CD
धाराशिवच्या बासरीवादकाच्या कलेचे पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून कौतुक सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २७ ः जिल्ह्यातील युवा बासरीवादक आणि चित्रकार जगदीश सुतार यांच्या कलागुणांची दखल पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी घेतली आहे. सुतार यांनी स्वतःच्या कुंचल्याने साकारलेले पंडितजींचे सुंदर स्केच त्यांची मुंबई येथील वृंदावन गुरुकुल येथे प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले. यावेळी पंडितजींनी या सुरेख कलाकृतीचे भरभरून कौतुक करत त्यांना प्रेमाने पाठबळ दिले. सुतार यांनी अत्यंत बारकाईने आणि कलात्मकतेने हे पेन्सिल स्केच साकारले आहे. नामवंत बासरीवादक पं. रुपक कुलकर्णी, अमर ओक, घनश्याम चंद, वैष्णवी जोशी, संभाजी कुदळे यासारख्या कलाकारांनी सुतार यांच्या बासरी वादनासह त्यांच्या चित्रकलागुणांचेही कौतुक केले आहे. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या प्रतिष्ठित वृंदावन गुरुकुलमध्ये प्रत्यक्ष जाऊन बासरी वादनाचा सखोल अभ्यास करण्याची सुवर्णसंधी आता सुतार यांना मिळणार आहे. बासरी वादनाची साधना करत असतानाच चित्रकलेची आवड जोपासत सुतार यांनी आपल्या कलेतून गुरूविषयीची श्रद्धा व्यक्त केली आहे. ....... धाराशिव ः पं. हरिप्रसाद चौरसिया यांना स्वतः साकारलेले पेन्सिल स्केच भेट देताना युवा बासरीवादक आणि चित्रकार जगदीश सुतार. फोटो क्रमांक ः OSM26B07286

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माझे वडील गेलेत...' राम पूर्णेकर ओक्साबोक्शी रडले; पोलिसांनी बळजबरीने रिक्षात कोंबलं; ठाण्यात काय घडलं?

Emergency Alert: ब्रिटन, अमेरिकेनंतर जपानही अलर्ट मोडवर! घरात ३ दिवसांचा अन्न-पाण्याचा साठा करा; नेमका धोका काय?

UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १२७ पदांसाठी 'या' दिवशी होणार परीक्षा

नागपूर पदवीधर निवडणूक : मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत २१ अपक्ष उमेदवारांचं आंदोलन; आयोगाविरोधात घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : श्रीमंत सरदार वाघ घराण्याच्या बोधचिन्हाचे आसले येथे उत्साहात अनावरण; दरवर्षी मेळावा घेण्याचा संकल्प

SCROLL FOR NEXT