छत्रपती संभाजीनगर

नांदेड विभागाच्या जळकोटमार्गे तीन बस

CD
नांदेड विभागाच्या जळकोटमार्गे तीन बस ---- विकास परिषदेच्या मागणीला यश; प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण ------ जळकोट, ता. १२ (शहर बातमीदार) ः नांदेड विभागाने बुधवार (ता. ११) पासून जळकोटमार्गे तीन बस सोडल्यामुळे प्रवासांची सोय झाली असून, विकास परिषदेच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. जळकोटमार्गे उदगीर ते नांदेड या मार्गावर अनेक वर्षांपासून बससेवेची कमतरता जाणवत होती. यापूर्वी प्रामुख्याने उदगीर आगारातून दिवसभरात सहा बसफेऱ्या होत होत्या. मात्र, सकाळी नऊनंतर जळकोटमार्गे नांदेडला जाण्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रवाशांना बसची वाट पाहत तासनतास थांबावे लागत होते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नांदेड आगारातूनही जळकोटमार्गे बससेवा सुरू करावी, अशी मागणी विकास परिषदेकडून नांदेड आगाराकडे अनेक दिवसांपासून होत होती. जळकोट येथील विकास परिषद, सामाजिक कार्यकर्ते व प्रवाशांनी नांदेडच्या आगारप्रमुखांकडे सातत्याने पाठपुरावा केला. प्रवाशांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन नांदेड येथील विभाग नियंत्रकांनी अखेर जळकोटमार्गे उदगीरसाठी तीन बस सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, जळकोटमार्गे नांदेड ते उदगीर बससेवा वाढविण्याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तीन नवीन बसच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. ---- दररोज सहावेळा नांदेडला जाण्याची सुविधा नवीन वेळापत्रकानुसार बुधवारपासून नांदेड बसस्थानकातून सकाळी सात, आठ आणि नऊला, तसेच दुपारी १.४५, २.३० आणि ३.३० ला बस सुटणार आहेत. उदगीर बसस्थानकातून सकाळी १०.३०, ११.१५ आणि १२.१५ ला, तसेच सायंकाळी पाच, सहा आणि सातला बस सुटणार आहेत. या बस जळकोटमार्गे धावणार असल्याने दोन्ही बाजूंनी प्रवाशांना दिवसभरात सहावेळा प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

Maharashtra State School Chess Championship: राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा दुसरा टप्पा उद्यापासून: राष्ट्रीय निवडीसाठी ३८७ खेळाडूंमध्ये चुरस

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

Smartphone Settings: तुमचा स्मार्टफोन तुमच्यावर नजर ठेवतोय? लोकेशन ट्रॅकिंग रोखण्यासाठी करा या सेटिंग्स बंद!

Latest Marathi News Live Update : दुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन : आमदार सतेज पाटील

SCROLL FOR NEXT