Jalana Road Traffic Sakal
छत्रपती संभाजीनगर

Jalana Road Traffic : जालना रस्त्यावर जाताय? ‘रुको जरा’!

ढिसाळ नियोजनाने दिवसभर वाहनकोंडी, नागरिकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्र यांच्या वाणीतून सोमवारपासून (ता. सहा) अयोध्यानगरी परिसरात तीनदिवसीय रामकथेस सुरुवात झाली. कथा श्रवणासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता शहर पोलिसांनी नियोजन करीत महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) ते रेल्वेस्थानक रस्ता सलग तीन दिवस सकाळी नऊपासून ते रात्री दहापर्यंत बंद केला.

पण, पोलिसांचे हे नियोजन अक्षरशः कोलमडले. शहराची लाइफ लाइन असलेल्या जालना रस्‍त्यावर दिवसभर वाहनकोंडी झाली. अवघे २ ते ३ किमीचे अंतर पार करण्यासाठी तास-दीड तास लागला. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्या.

यावेळी रेल्वे स्थानक येथे वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी सांगितले की, त्यांना जालना रस्त्यावर जाण्यासाठी सेशन कोर्ट सिग्नल, क्रांती चौक, दूध डेअरी चौक, मोंढा नाका, आकाशवाणी आदी ठिकाणचे चौक सोडून थेट सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली यावे लागले. त्यामुळे या सगळ्या परिसरात अचानक वाहनांची गर्दी झाल्याने मोठी वाहनकोंडी झाली. त्याचा फटका नागरिकांना बसला.

पर्यायी मार्गही ठप्प

शहर पोलिस दलाकडून बाबा पेट्रोल पंप ते रेल्वेस्थानक हा रस्ता तीन दिवसांसाठी सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत पूर्णपणे बंद केला आहे. दरम्यान सोमवारी क्रांती चौकातून कलश यात्रा काढण्यात आली.

त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक रेल्वे स्थानक-कोकणवाडी चौक-जिल्हा न्यायालय चौक किंवा क्रांती चौक मार्गे वळविली होती. मात्र, सोमवारी सकाळी क्रांती चौकातून निघालेल्या कलश यात्रेनिमित्त रेल्वे स्थानक ते क्रांती चौक या रस्त्यावरील वाहतूक गोपाल टी पासून संत एकनाथ रंगमंदिर रस्त्याने सिंधी कॉलनीकडे वळविली.

मात्र, कारसह बससारखी मोठी वाहने या अरुंद रस्त्यावर आल्याने एकच गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी होऊन तोही मार्ग अचानक ठप्प झाला. अनेकांनी कोंडीतून मार्ग काढत तानाजी चौक ते मोंढा नाका रस्त्याने मोंढा नाका गाठण्याचा प्रयत्न केला. पण, त्या रस्त्यावरही संपूर्ण कोंडी झाली होती. तिथून काल्डा कॉर्नर गाठला.

मात्र, तेथून दूध डेअरी चौकापर्यंत जाताना अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. परिणामी, अनेकांनी रोपळेकर चौकाकडे जाऊन जवाहरनगर पोलिस ठाणे, त्रिमूर्ती चौक मार्गे सेव्हनहिल उड्डाणपुलाकडे जाण्याचा मार्ग पत्करला, तिथून त्यांना जालना रोड ओलांडता आला.

दोन चौकात बॅरिकेड्स

वाहनधारकांनी सांगितले की, एकीकडे जालना रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे पोलिसांनी एरव्ही बंद असलेले आकाशवाणी आणि दूध डेअरी चौकातील बेरिकेड्स काढणे आवश्यक होते.

मात्र, वाहतुकीचा ओघ तसाच सुरू ठेवल्याने मोंढा नाका, क्रांती चौक उड्डाणपुलाखाली आणि पुलावर, बाबा चौक ते नगरनाका अशी लांबलचक वाहतूक कोंडी झाली. मोठी वाहने छोट्या रस्त्यावर वळविली गेल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे त्या त्या भागातील रहिवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

‘साभार गांधीगिरी’

आधीच वाहतूक कोंडीने शहरवासीय हैराण आहेत. ‘बागेश्‍वर धाम’च्या धार्मिक कार्यक्रमासाठी पोलिसांनी केलेल्या ‘नियोजना’ने त्यात आणखीनच भर पडली. आता जाब विचारायचा कुणाला? तर पोलिसांच्या वाहतूक शाखेला. पण त्यांच्यावरच केंद्रीय राज्यमंत्र्यांचा आणि बड्या पदाधिकाऱ्यांचा दबाव! अशावेळी पोलिस तरी काय करणार? नागरिकांची तक्रारही कुणी ऐकून घेणार नाही.

मग काही सुजाण नागरिकांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावना तीव्र स्वरूपात मांडल्या. बीड बायपासवासीयांनी तर मुंबईच्या ‘ट्रॅफिक’चे ‘फिलिंग’ दिल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांचे ‘आभार’ मानत ‘साभार गांधीगिरी’ केली! सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT