traffic jam sakal
छत्रपती संभाजीनगर

जळगाव राष्ट्रीय महामार्ग पाच तास ठप्प

सिल्लोड शहरालगत मालट्रक उलटल्याने वाहनधारकांचे हाल

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर शहरालगत असलेल्या सहारे ट्रेड समोर रविवारी (ता.३) सकाळच्या सुमारास खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मालट्रक पलटी झाला. यावेळी मागून येणारे दुसरे वाहनही धडकल्याने रस्त्यावरच वाहने आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक जवळपास पाच तास ठप्प झाली होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजिंठ्याकडून सिल्लोडकडे येत असलेली मालट्रक (क्र.एम.एच-४.जीसी-५५७९) चालकाने खड्डा चुकविण्याच्या प्रयत्न केल्यानंतर मालट्रक रस्त्यालगत आडवी झाली. त्यामागून येणारे दुसरे वाहन मालट्रकला धडकून रस्त्यावर आडवे झाले. यामुळे रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली.

सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या अपघाताने रस्त्याच्या दुतर्फा दुपारी बारा वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यानंतर खड्ड्यांमध्ये मुरमाचे भरती करून मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, शहरालगत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे.

या खड्ड्यांमध्ये बांधकाम विभागाच्या वतीने थातूरमातूर पद्धतीने मुरूम टाकण्यात येतो. जळगावकडून शहरात येताना रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात घडत आहे. परंतु रविवारी झालेल्या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसून, रहदारी मात्र पाच तास ठप्प झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT