cotton sakal
छत्रपती संभाजीनगर

जालना : आष्टीत कापसाला आठ हजारांचा भाव

शेतकऱ्यांमध्ये समाधान, दिवाळीपूर्वी दिलासा

सकाळ वृत्तसेवा

आष्टी (जि.जालना) : परतूर तालुक्यातील आष्टी येथील बाजारपेठेत खासगी कापूस व सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.२६) कापसाला ८ हजार ते ८ हजार हजार दोनशे रुपये भावाने तेजी आली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी सणापूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे.


परतूर तालुक्यातील आष्टी भागात मागील महिनाभर पडलेल्या पावसाने हाहाकार केल्याने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी कापसाच्या उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली. दरम्यान कापूस वेचणी, सोयाबीनची काढणी यावर दुप्पट खर्च होत आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. शेतमाल पदरात पडताच विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत. येथील व्यापाऱ्यांनी खासगी खरेदीसाठी सरसावले आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कापसाला चांगला भाव मिळत आहे. येथे मंगळवारी कापसाला ८ हजार दोनशे रुपये विक्रमी भावात खरेदी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे.

सोयाबीनच्या भावात घसरण
आष्टी येथील बाजारात सोयाबीनचे भाव कमालीचे घसरले आहेत. महिन्यापूर्वी ११ हजारावर गेलेले सोयाबीनचे भाव आता चक्क ४ हजार ते ५ हजारावर आले. त्यातच माऊश्चरचे कारण पुढे करून सोयाबीनची कमी दराने खरेदी व्यापाऱ्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे येथील बाजार समिती अंतर्गत मोंढा यार्डात बीट पद्धतीने शेतमालाची खरेदी-विक्री सुरु होण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. यार्डात बीट पद्धतीने शेतमालाची खरेदी विक्री झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल अशी खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court: राज्यात आमदार-खासदारांवर ३९८ खटले, लवकर निकाली काढा; हायकोर्टाचे विशेष न्यायालयांना आदेश

Nilesh Ghaiwal: घायवळ टोळीच्या अमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश? पुणे पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर

पटेलांनी टोचलेल्या इंजेक्शनचा परिणाम, तब्येतीचं कारण सांगत आणखी एका नेत्यानं पालकमंत्रीपद सोडलं; काय घडलं?

Gmail Safety Tips : तुमचं Gmail हॅक तर झालं नाहीये ना? आत्ताच पाहा नाहीतर होईल खूपच उशीर..सर्व लॉगिन डिवाइस चेक करा एका क्लिकवर

Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

SCROLL FOR NEXT