सानपाडा स्थानकात प्रवाशाला लुटले 
छत्रपती संभाजीनगर

जालन्यात भरदिवसा पिस्तुलीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले, दरोडेखोर पसार

आमचे काम थांबले असून आम्हाला एलबो द्या, अशी विनंती त्यांनी सावरमल झाला यांनी केली.

उमेश वाघमारे

जालना : शहरातील (Jalna) संभाजीनगर येथील पारस एजन्सी या व्यापाऱ्याला दुकान एलबो खरेदीचा बहाणा करून तीन दरोडेखोरांनी पिस्तूल (Pistol) आणि चाकूचा (Knife) धाक दाखवून लुटल्याची (Looting) घटना रविवारी (ता.नऊ) दुपारी बारा-साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी व्यापारी (Trader) व दरोडेखोर यांच्यात झालेल्या हातापायीत व्यापारी सावरमल झाला हे जखमी झाले. शहरातील संभाजीनगर परिसरात सावरमल झाला यांची हार्डवेअरची पारस एजन्सी आहे. या परिसरात ते राहतात. रविवारी दुपारी बारा-साडेबारा वाजेच्या सुमारास दोन ते तीन व्यक्ती त्यांच्याकडे आले. आमचे काम थांबले असून आम्हाला एलबो द्या, अशी विनंती त्यांनी सावरमल झाला यांनी केली. (Jalna Crime News Trader Looted In Day Light, Thieves Ran Away)

त्यामुळे सावरमल झाला यांनी दुकान उघडले. दुकानात प्रवेश करताच तीन जणांपैकी एकाने पिस्तुल व एकाने चाकू काढत सावरमल झाला यांना धमकावत गळ्यातील सोन्याची साखळी, अंगठी व गळ्यातील २० ते २५ हजार रूपये असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे हे दरोडेखोरांनी सीसीटीव्ही फुटेज ही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापारी सावरमल झाला व दरोडेखोरांमध्ये हातपायी झाल्याने या तिघांनी पिस्तुल व चाकू घटनास्थळी सोडून पळ काढला. दरम्यान त्याचा एक साथीदार दुचाकी घेऊन बाहेर उभा होता. दरोडा टाकल्यानंतर दोन दुचाकीवरून हे सर्व जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शहरात नाकाबंदी लावली. मात्र, दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले नाही.

लॉकडाउन बंदोबस्त नसल्याचा परिणाम

जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची नेहमीप्रमाणे गर्दी नाही. परंतु, पोलिसांकडून ही लॉकडाउन बंदोबस्त लावण्यात आलेला नाही. त्यामुळे लॉकडाउनमध्ये अनेक जण बिनबोभाट फिरत आहेत. याचा फायदा घेत हे दरोडेखोर लॉकडाउन लागू असताना ही भरदिवसा पिस्तुल व चाकू घेणे शहरात दुचाकीवर फिरत दरोडा टाकला. जर लॉकडाउनचा चौकाचौकात पोलिसांकडून बंदोबस्त लावून लॉकडाउनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईसह झडत्या घेतल्या असत्या तर ही घटना टाळता आली असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT