‘जळकोटला जि.प.चा स्वतंत्र
बांधकाम उपविभाग सुरू करा’
---------
जळकोट, ता. २४ (बातमीदार) ः तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल २७ वर्षे उलटली तरी जळकोट येथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे स्वतंत्र कार्यालय कार्यान्वित झालेले नाही. १९९९ पासून सातत्याने मागणी व पाठपुरावा करूनही उपविभाग मंजूर होत नसल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे येथे तातडीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सुरू करावा, अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते सचिन केंद्रे यांनी केली आहे.
जळकोट हा डोंगरी व मागास तालुका असल्याने ग्रामीण विकासासाठी विविध योजनांतून निधी उपलब्ध होतो. मात्र, तांत्रिक प्रक्रिया, अंमलबजावणी व निधीच्या विनियोगासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसल्याने कामांना विलंब होत आहे. सध्या जळकोटसह तीन तालुक्यांचा कारभार उदगीर येथील उपविभागावरून आहे. मोठे कार्यक्षेत्र असल्यामुळे जळकोटमधील रस्ते, शाळा, शासकीय इमारती व आरोग्य केंद्रांच्या बांधकामांकडे दुर्लक्ष होत आहे.
निधी उपलब्ध असूनही कामांना गती मिळत नसल्याने नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना उदगीरला सतत जावे लागत आहे. जळकोटच्या विकासातील ही कोंडी दूर करण्यासाठी येथे स्वतंत्र उपविभाग त्वरित मंजूर करावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सचिन केंद्रे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, आशीष पाटील, मेहताब बेग, अक्षय बडगीरे, गोविंद केंद्रे, सभापती सुनीता कोसबे, संभाजी कोसबे, उपसभापती माधव वाघमारे, राजेंद्र केंद्रे आदींनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.