कुंभार पिंपळगाव (जि.जालना) : गादीघरातील साहित्य जळून खाक झाले आहे. 
छत्रपती संभाजीनगर

जालना जिल्ह्यात गादीघर, दुकानांना आग; लाखो रुपयांचे नुकसान

आगीच्या भडक्याने दुकानातील रूई मशीन, शिलाई मशीन, तयार गाद्या, रुई गठाण, गादीपाठ गठाण यासह विविध साहित्य जळून खाक झाले. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.

लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) : कुंभार पिंपळगाव (Jalna) येथील राजा टाकळी रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर असलेल्या गादीघरासह मंडप डेकोरेशन, ऑटोमोबाईल व मोबाईल दुकानाला सोमवारी (ता.१७) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाॅर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर (Primary Health Centre) वाहेद गादीघर आहे. सकाळी वाहेद शेख व युसुफ शेख दुकानाची साफसफाई करीत असताना दुकानाच्या छतावरून गेलेल्या विजेच्या वायरामुळे Shortcircuit) शाॅर्टसर्किट झाले. आगीच्या ठिणग्या पत्रावर पडले आणि आग भडकली. (Jalna Latest News Fire Damages Shops In Kumbhar Pimplgaon)

सुदैवाने शेख बंधू बाहेर पळाल्याने जीवितहानी टळली. आगीच्या भडक्याने दुकानातील रूई मशीन, शिलाई मशीन, तयार गाद्या, रुई गठाण, गादीपाठ गठाण यासह विविध साहित्य जळून खाक झाले. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. यात शेजारी असलेल्या मोबाईल दुकानाचे फर्निचर, डेकोरेशन मंडप दुकानातील मोठे साऊंड बाॅक्स, वधुवराचे आसन, गाद्या, चटाया यासह विविध साहित्य, तर ऑटोमोबाईल दुकानातील सामान, ऑईल, टायर, ट्युब असे लाखो रूपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, युवक धावल्याने व पाण्याचे टँकर आणल्याने आग आटोक्यात आली. सदरील घटनेचा दुपारपर्यंत पंचनामा झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT