छत्रपती संभाजीनगर

पोलिस मनुष्यबळ घटल्याने जळकोट

CD
एका पोलिस ठाण्यावर ४७ गावांचा भार जळकोट, ता. १६ (बातमीदार) : मंजूर पदांच्या तुलनेत अत्यल्प मनुष्यबळ उपलब्ध असल्याने जळकोट तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गुन्ह्यांचा तपास आणि ४७ गावांतील सुरक्षा व्यवस्था सांभाळताना पोलिसांवर ताण येत असून, मंजूर आकृतिबंधानुसार जळकोट पोलिस ठाण्यास पूर्ण मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जळकोट तालुक्यात एकमेव पोलिस ठाणे असून, ४७ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी याच ठाण्यावर आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे गंभीर घटनांना प्रतिसाद देणे तसेच दाखल गुन्ह्यांचा तपास करणे अवघड होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जळकोट हा लातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगतचा, डोंगराळ व दुर्गम तालुका असल्याने या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसे पोलिस मनुष्यबळ आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच संबंधित पोलिस प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेसचे युवानेते सचिन केंद्रे, महेश धुळशेट्टे, मेहताब बेग, अक्षय बडगिरे, राम काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT