समृद्धी कारखान्याचा पेटला बॉयलर Sakal
छत्रपती संभाजीनगर

घनसावंगी : समृद्धी कारखान्याचा पेटला बॉयलर

ऊस उत्पादकांना १०० रुपयांचा तिसरा हप्ता जमा

सकाळ वृत्तसेवा

घनसावंगी : देवीदहेगाव येथील समृद्धी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवारी (ता.२२) अध्यक्ष सतीश घाटगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यानिमित्त श्री.घाटगे पाटील म्हणाले, की समृद्धी साखर कारखान्याच्या सभासदांचा साडेसहा लाख टन ऊस उपलब्ध आहे, कारखाना साडेपाच लाख टन गाळप करील. एक लाख टनाच्या उसासंदर्भात इतर कारखान्यांशी गाळपासंबंधी चर्चा सुरू आहे. संपूर्ण ऊस गाळप करून कारखाना पाऊस पडेपर्यंत चालवण्यात येईल.

कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र मेठी, वैशालीताई घाटगे पाटील, रिंकूताई मेठी, संचालक दिलीप फलके, अभिजित सुंदरराव उढाण, मधुकर जगदाळे, अशोक बोबडे, दिलीप गुजर, दत्ता वाघमारे आदी उपस्थित होते.

सतीश घाटगे पाटील म्हणाले की मागील वर्षी कारखान्याने पाच लाख २२ हजार ५०० टन गाळप करून ५ लाख १४ हजार ७०० पोती उत्पादित केली असून वीजनिर्मितीतून कारखान्यास १७ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. सरासरी उतारा ९.८५ आला. कारखान्याने ऊस उत्पादकांना एफआरपी पेक्षा १०० रुपये जास्तीचे अदा केले आहेत. परिसरातील दुसऱ्या कारखान्यांपेक्षा १०० ते १५० रुपये कमी भावाचे कारण म्हणजे उसाची सरासरी रिकव्हरी आहे.

कारखान्याकडून यंदा रिकव्हरीसाठी नियोजन केले आहे. साखर उतारा जास्त कसा येईल जेणेकरून परिसरातील इतर कारखान्यांचा दर समृद्धीच्या शेतकऱ्यांना अदा करता येईल. अतिरिक्त पावसामुळे जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. गोदावरी नदीवरील सर्व बंधारे, छोटी मोठी धरणे १०० टक्के भरली असल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढणार असून कारखान्यात ८०० टन प्रति दिन विस्तारित करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात काम पूर्ण होऊन पुढील वर्षी कारखाना ३ हजार ८०० टन प्रति दिन क्षमतेने चालेल. त्यामुळे पुढील वर्षी साडे सात लाख टन ऊस गाळप होईल. तसेच दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमास रंजीतराव उढाण, विकास शिंदे, व्यवस्थापक श्री. माधनकर, मुख्य शेतकी अधिकारी अमोल तौर, प्रदीप घाटगे पाटील, श्री. सिंग साहेब, श्री. माथूर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तसेच भागातील शेतकरी, तोड वाहतूक, ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT