छत्रपती संभाजीनगर

झेंडू उत्पादकांची दिवाळी गोड!

CD
जवळा बाजारात झेंडूची ‘दिवाळी गोड’ - लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आवक घटल्याने दरात तिप्पट उसळी जवळा बाजार, ता. ९ (बातमीदार) : लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील फुलबाजारात झेंडूच्या फुलांना विक्रमी भाव मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः गोड झाली आहे. रविवारी (ता. आठ) सकाळी अवघ्या ५० रुपये प्रतिकिलो दराने सुरू झालेली विक्री मागणी वाढल्याने सायंकाळपर्यंत थेट १५० रुपयांवर पोचली. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या छायेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले. यंदा प्रतिकूल हवामानामुळे बाजारात स्थानिक फुलांची आवक अत्यंत मर्यादित राहिली. यंदा दसऱ्याच्या सणाला झेंडूला प्रतिकिलो अवघा १० ते २० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघाला नव्हता. त्यामुळे दिवाळीत तरी भाव मिळेल का, याबाबत उत्पादकांमध्ये मोठी धाकधूक होती. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच दुकानांची सजावट, घरगुती आरास आणि वाहनांच्या पूजनासाठी झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी राहिली. ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या गर्दीने बाजारपेठ गजबजून गेली होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्याने दुपारनंतर फुलांच्या दरात चढाओढ सुरू झाली आणि भाव दीडशे रुपयांपर्यंत झेपावले. अखेरच्या टप्प्यात चांगला परतावा हाती आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Mumbai Airport: मुंबईतून परदेशात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना आता नवी मुंबई गाठावी लागणार? १२ कंपन्यांचा विरोध का?

Maharashtra Live News: अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादातून रक्तरंजित हल्ला; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT