छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाच्या झळा तीव्र; विहिरींनी गाठला तळ, रब्बी पिकांवर संकट!

CD
ABD26J83355, ABD26J83356 जवळा पांचाळ ः शेतकरी भगवान हामदे यांच्या शेतातील विहिरीने गाठलेला तळ. (दुसऱ्या छायाचित्रात) शेतकरी बाळू जाधव यांच्या शेतात स्प्रिंकलरच्या साहाय्याने हरभरा पिकाला पाणी देताना. कळमनुरी परिसरात विहिरी, कूपनलिका कोरड्या - रब्बीवर पाणीटंचाईचे सावट; उत्पादनात मोठ्या घटीची शेतकऱ्यांना भीती जवळा पांचाळ, ता. १८ (बातमीदार) ः कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ आणि परिसरात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. भूजल पातळी खालावल्याने परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून कूपनलिकाही कोरड्या पडल्या आहेत. परिणामी, ऐन हंगामात रब्बी पिकांसमोर गंभीर पाणीसंकट उभे राहिले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हळद, केळी, ऊस, हरभरा, तूर, गहू यासह भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने आणि जलस्रोत आटल्याने ही पिके जगवायची कशी, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करत असले, तरी पाणीसाठाच शिल्लक नसल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. आधीच खरीप हंगाम हातातून गेला असून आता रब्बीही वाया गेल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडणार आहे. त्यामुळे शासनाने या भागात तत्काळ दुष्काळी उपाययोजना राबवून दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रतिक्रिया यंदा पाऊस न पडल्याने विहिरी आणि कूपनलिकांची पातळी पूर्णपणे खालावली आहे. खरिपात मोठे नुकसान झाले, आता रब्बी तरी वाचेल अशी आशा होती; मात्र पाणीच नसल्याने पिके जगवणे कठीण झाले आहे. - भगवान हामदे, शेतकरी, डिग्रस (बु.) प्रतिक्रिया हळद, हरभरा, गहू आणि ऊस या पिकांना नियमित पाण्याची गरज असते. पाऊस नसल्याने जमिनीत ओलावा उरलेला नाही. सिंचनाचे नियोजन करूनही पाणी पुरत नाही. हीच स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल. - कार्तिक नागनगिरे, शेतकरी, जवळा पांचाळ प्रतिक्रिया भाजीपाल्याला दररोज पाणी द्यावे लागते. विहिरी कोरड्या पडल्याने तुषार आणि ठिबकच्या साहाय्याने पिके जगवण्याची धडपड सुरू आहे. पाण्याअभावी भाजीपाला सुकून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. - गजानन जाधव, भाजीपाला उत्पादक शेतकरी, जवळा पांचाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

Devuthani Ekadashi Do's & Don'ts: देवउठणी एकादशीला चुकूनही करू नका 'या' ६ चुका; व्रत करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम!

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

SCROLL FOR NEXT