छत्रपती संभाजीनगर

जवळा पांचाळ परिसरात ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी; शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल

CD
ABD26J83134 जवळा पांचाळ ः परिसरातील शेतात ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी करताना शेतकरी. जवळा पांचाळमध्ये शेतीला तंत्रज्ञानाची जोड ड्रोनद्वारे तूर, हरभरा, हळदीवर औषध फवारणी; वेळेसह पाण्याची बचत जवळा पांचाळ, ता. १४ (बातमीदार) : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ आणि परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर वाढताना दिसत आहे. सध्याच्या वातावरणातील बदलांमुळे तूर, हरभरा आणि हळद या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव तसेच बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. या संकटावर मात करण्यासाठी आणि पिकांच्या संरक्षणासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतीला फाटा देत ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणीला पसंती दिली आहे. शेतीमध्ये पारंपरिक पंपाने फवारणी करताना मोठा खर्च, मजुरांची कमतरता आणि अतिरिक्त वेळ लागत असे. मात्र, ड्रोन तंत्रज्ञानामुळे अवघ्या काही मिनिटांत मोठ्या क्षेत्रावर अचूक फवारणी करणे शक्य झाले आहे. यामुळे औषधांचा अपव्यय टळतो आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर बचत होते. शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि मजुरांची टंचाई लक्षात घेता, हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या मोहिमेदरम्यान परिसरातील अनिल गंगेवार, विलास खंडागळे, गोविंद बिलकटे, साईनाथ बिलकटे, गजानन उधाणे, शिवप्रसाद नागनगिरे, रमाकांत नागनगिरे व ओम नागनगिरे यांच्या शेतात ड्रोनद्वारे यशस्वी फवारणी करण्यात आली. --- प्रतिक्रिया सध्या तूर, हरभरा आणि हळदीवर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तातडीने फवारणी करणे गरजेचे होते. ड्रोनमुळे कमी श्रमात आणि कमी वेळेत अचूक फवारणी झाली असून पाण्याचीही मोठी बचत झाली. - कार्तिक नागनगिरे, स्थानिक शेतकरी --- प्रतिक्रिया पूर्वी पाठीवरील पंपाने फवारणीसाठी मजूर शोधावे लागत आणि दिवस खर्ची पडायचा. आता ड्रोनमुळे काही तासांत सर्व क्षेत्र कव्हर होते. बदलत्या काळात शेतीत असे तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनली आहे. - गोविंद बिलकटे, शेतकरी --- प्रतिक्रिया ड्रोनद्वारे फवारणी करताना पिकांच्या गरजेनुसार पाणी आणि औषधांचे प्रमाण नियंत्रित ठेवले जाते. औषध पिकांच्या पानांवर पानांखाली समप्रमाणात पोहोचते, ज्यामुळे रोगांचे नियंत्रण प्रभावीपणे होते आणि शेतकऱ्यांचे श्रम वाचतात. - विजय सातपुते, ड्रोन चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT