ABD26J80753
जवळा पांचाळ (ता. कळमनुरी)ः पावसाअभावी करपत असलेले हळदीचे पीक. (छायाचित्र ः अविनाश उदगिरे)
--------
पावसाअभावी करपले हळदीचे पीक
-----------------
जवळा पांचाळ येथे उत्पादकांना फटका
जवळा पांचाळ, ता. ५ (बातमीदार)ः जवळा पांचाळ परिसरातील यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील ओलाव्यात होत असलेली घट यामुळे हळद पिकाला मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी हे पीक करपले आहे. पिकाची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
हळदीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते. यंदा पावसाअभावी परिसरातील विहिरी, बोअरवेलमध्ये पुरेसा साठा होऊ शकला नाही, नदी-नाले कोरडे आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्यात पिकास पुरेसे पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. परिणामी, हळदीची पाने करपून पिकाची अवस्था बिकट झाली आहे.
हळद लागवडीसाठी परिसरातील वडगाव, रेडगाव, डिग्रस, वसफळ, गुंडलवाडी, सालापूर येथील शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, पिकाला अपेक्षित पाऊस न मिळाल्याने केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
((कोट)))
हळदीसाठी मशागत, बियाणे, खत आणि औषधांवर मोठा खर्च केला. मात्र, पाऊस न झाल्याने पीक सुकून करपले आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर वाया जात असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
-गजानन बोराटे, हळद उत्पादक
---------((कोट)))
वाढत्या तापमानाचा हळदीस मोठा फटका बसत आहे. पाण्याची कमतरता असल्याने पिकाला पाणी देता आले नाही. आता उत्पादन किती मिळेल याची चिंता आहे. शेतीचा खर्चही निघणार नाही.
-कार्तिक नागनगिरे, हळद उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.