छत्रपती संभाजीनगर

जायकवाडी धरणातून पिण्याच्या पाण्यासह रब्बीसाठी तीन आवर्तने द्या

CD
पिण्याच्या पाण्यासह रब्बीसाठी ‘जायकवाडी’ची आवर्तने सोडा ------ आमदार विटेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ------ सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २६ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जायकवाडी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी, रब्बी ज्वारी व चारा पिकांसाठी तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी (ता. २६) निवेदनाद्वारे केली. जिल्ह्यात खरीप हंगामातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जायकवाडी धरणात सध्या ७८ टक्के साठा उपलब्ध असल्याने या पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे विटेकर यांनी म्हटले आहे. धरणाच्या डाव्या कालव्यावर मानवत, सोनपेठ, पाथरी व परभणी ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गरज अवलंबून असून, ९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन तीन आवर्तनांचे नियोजन करावे. एप्रिल-मे २०२७ मधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आणखी दोन आवर्तनांचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली. कालव्यांची दुरुस्ती वेळेत करून टोकापर्यंत पाणी पोचावे. चारा पिकांचे उत्पादन वाढल्यास दुष्काळग्रस्त बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांना चारापुरवठा करणे सुलभ होईल. तसेच चारा पिकांची हमीभावाने खरेदीबाबतही सरकारने कार्यवाही करावी, असे विटेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT