छत्रपती संभाजीनगर

ज्येष्ठांचा जीवनगौरव पुरस्काराने

CD
ज्येष्ठांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान मानसिक आरोग्य व सुरक्षिततेवर कार्यशाळेत सत्कार समारंभ ----- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १ : सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (मुंबई), प्रादेशिक संसाधन केंद्र (मुंबई) व ज्येष्ठ नागरिक संघ (लातूर) यांच्या वतीने लातुरात ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य व आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षितता या विषयावर ज्येष्ठांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठांच्या योगदानाची आणि भरीव कार्याची दखल घेऊन त्यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त यादव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. माया कुलकर्णी, डॉ. काशिनाथ सलगर, प्रकाश घादगिने, रमेश भोरेकर, प्रकाश नीला, शहाजी घाडगे, वसंत बेडे, नीलिमा येतकर, डॉ. भास्कर बोरगावकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी चंद्रकांत नारायणराव जोशी, व्यंकटराव नारायणराव ढगे, बसवराज विश्वनाथ उटगे, गौतमचंद विठ्ठलराव देशमाने, अशोक गोस्वामी, मंगला सास्तुरकर, चंद्रकांत नारायणराव साळुंखे या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियम २००७ ज्येष्ठ नागरिक न्यायाधीकरणाचे अधिकार कार्यपद्धती व तक्रार निवारण प्रक्रिया या विषयाला धरून ज्येष्ठांना कायद्याविषयी व न्यायाधीन बाबीबाबत सखोल माहिती दिली. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य व भावनिक स्वास्थ्य या विषयावर डॉ. आशिष चेपुरे यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात ज्येष्ठांसाठी आपत्कालीन परिस्थितीतील सुरक्षितता या विषयावर डॉ. ऋषिकेश हरिदास यांनी प्रात्यक्षिकासह संवाद साधला. नीलिमा येतकर यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. सुनीता बोरगावकर व उषा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बोरगावकर यांनी आभार मानले. ----- LTR26B15526 लातूर : जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ नागरिकांसमवेत रोहिणी नऱ्हे-विरोळे, यादव गायकवाड, अविनाश देवशेटवार, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. माया कुलकर्णी, डॉ. काशिनाथ सलगर, प्रकाश घादगिने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

SCROLL FOR NEXT