छत्रपती संभाजीनगर

शिवरायांच्या चरणी पणत्यांची आरास; जिजाऊ ब्रिगेडतर्फे दीपोत्सव साजरा!

CD
ABD26J82806 हिंगोली : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्योती कोथळकर, प्रियंका चिखलीकर, स्मिता दळवी, सलोखा इंगोले, संजीवनी पडोळे आदी. ---------------- शिवरायांच्या चरणी पणत्यांची आरास ---- हिंगोली, ता. ६: दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाला असून, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी (ता.पाच) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. स्वराज्याची ज्योत पेटवणाऱ्या आणि अन्यायाच्या अंधकाराविरुद्ध लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी असंख्य पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. पणत्यांच्या मनमोहक आरास आणि दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने संपूर्ण पुतळा परिसर उजळून निघाला. शिवरायांच्या चरणी पहिला दिवा अर्पण करून दीपावली साजरी करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला. शिवरायांच्या विचारांचा जागर आणि स्वराज्याच्या प्रेरणेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. या दीपोत्सवप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा ज्योती कोथळकर, जिल्हाध्यक्षा प्रियंका चिखलीकर भोयर, उपाध्यक्षा स्मिता दळवी, शहराध्यक्षा सलोखा इंगोले, सचिव संजीवनी पडोळे, कार्याध्यक्षा सुरेखा जगताप, सहकार्याध्यक्षा शारदा दोडके, कल्पना नीळकंठे, अंजली गाढे, कल्पना सोळंखे, सोनाली देशमुख यांच्यासह श्याम सोळंके, योगेश भोयर, जगन्नाथ जगताप, अतिष नीळकंठे, संतोष दोडके यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! पाय तोडून कचऱ्यात टाकले; सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

IPL 2027 Trade: लखनौ सुपर जायंट्स-राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठी डिल... ३-४ खेळाडू जाणार इथून तिथे; कोण असतील ते?

Vastu Tips: लाकूड, मेटल की दगड? वास्तुनुसार कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय प्रगतीचं रहस्य!

Gangapur News: एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे विहिरीत पाण्याचा अखंड झरा! गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुर्दमध्ये कुतूहल, पाहण्यासाठी गर्दी

मोठी बातमी! कर्मभूमी एक्स्प्रेसच्या ४ डब्यांना भीषण आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

SCROLL FOR NEXT