छत्रपती संभाजीनगर

नोकरीच्या आमिषाने एक कोटी १३ लाखांचा गंडा

CD
नोकरीच्या आमिषाने एक कोटी १३ लाखांचा गंडा -- उदगीर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल -- उदगीर, ता. १० (बातमीदार) : ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीसह इतरांची तब्बल एक कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतीक्षा ज्ञानेश्वर राजुरे (वय २९, रा. रामरक्षा निवास, नई आबादी, उदगीर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. अभय प्रताप शर्मा (रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश), दशरथ विठ्ठल जाधव (रा. शिक्षक कॉलनी, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि सचिन शिवराम धमाले (रा. वडगाव कोल्हाटी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १३ ऑगस्ट २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संबंधित आरोपींनी संगनमत करून ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचे आमिष फिर्यादी व इतर साक्षीदारांना दाखविले. या आमिषातून त्यांची एकूण एक कोटी १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी नऊ ऑक्टोबरला उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

थांबायचं नाय गड्या...! अभिजीत दीपकेचा नवा Video, CJP आंदोलनाची सूत्र अजिंक्य शिंदेच्या हाती; कोण आहे तो?

IND vs WI, 3rd T20I: वैभव सूर्यवंशी बाकावरच! शिवम दुबे OUT नितीश रेड्डी IN; तिसऱ्या सामन्यासाठी कशी असेल Playing XI?

Shrirampur Accident: श्रीरामपूरमध्ये थरार! डंपरखाली चिरडली जाणार होती तरुणी, क्षणात बंपर पकडून वाचवला जीव; CCTV व्हिडीओ व्हायरल!

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या आजीचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास

Marathi News Live Updates : अभिजीत दिपके यांच्या अटकेने आईच्या अश्रूंचा बांध फुटला, वडिलांचाही संयम सुटला, सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT