छत्रपती संभाजीनगर

ज्वारीच्या दाण्यांतून साकारला गणराय

CD
फोटो- ज्वारीपासून साकारलेला गणपतीमूर्ती ABD26J79456 -- ज्वारीतून साकारले १५ फुटी गणराज पर्यावरणपूरक मूर्ती; मुलमची बाजारातील शिवसेना गणेश मंडळाची अनोखी संकल्पना ---- छत्रपती संभाजीनगर, ता. १५ ः शहागंज सराफा रोडवरील ऐतिहासिक मुलमची बाजार येथील शिवसेना गणेश मंडळ हे दरवर्षी आपल्या अतिशय कल्पक आणि अनोख्या गणेशमूर्तींसाठी संपूर्ण शहरात आकर्षणाचे केंद्र ठरते. यंदा मंडळाने तब्बल १५ फूट उंच ज्वारीपासून गणरायाची मूर्ती साकारली आहे. असून, पारंपरिक भक्तीला पर्यावरणपूरकतेची जोड देणारी ही संकल्पना शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे. मुलमची बाजार येथे शिवसेना गणेश मंडळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून विविध साहित्यांपासून गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा आहे. १९९६ पासून बांबूपासून मूर्ती तयार करण्याची प्रथा मंडळाने सुरू केली. त्यापूर्वी विविध कडधान्यांपासूनही गणरायाच्या मूर्ती साकारण्यात आल्या होत्या. कोरोना काळात ही परंपरा काही काळ खंडित झाली. मात्र, २०२४ पासून मंडळाने पुन्हा या अनोख्या उपक्रमाला सुरवात केली. २०२४ मध्ये मंडळाने बडीसौफपासून १२ फूट उंच मूर्ती, तर २०२५ मध्ये साबुदाण्यापासून १४ फूट श्रींची मूर्ती साकारली होती. या दोन्ही मूर्तींना शहरासह मराठवाड्यातून मोठी प्रसिद्धी मिळाली. विविध माध्यमांमधून तसेच सामाजिक माध्यमांवर या मूर्तींची चर्चा झाली. ९० किलो ज्वारीचा उपयोग यंदा मंडळाच्या सदस्यांनी ज्वारीपासून मूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला. मूर्तिकार आनंद जातेकर, गोविंदा जातेकर, आमन कंचनकर आणि स्वप्नील चौधरी यांनी अडीच ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही १५ फुटांची मूर्ती साकारली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी ९० किलो ज्वारी, ६० बांबू, सुमारे ९० मीटर कापड आणि २५ किलो डिंक वापरण्यात आला आहे. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हाच मंडळाचा संकल्प ः विशेष म्हणजे ज्वारीसारख्या नैसर्गिक घटकाचा वापर करून मूर्ती साकारल्याने या उपक्रमाला पर्यावरणपूरकतेचे महत्त्व प्राप्त झाले आहे. भक्ती, कल्पकता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम या मूर्तीच्या माध्यमातून साधण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष सुशांत जातेकर, सहअध्यक्ष कृष्णा कुचलकुंठे, आदित्य तंगडपल्ली, रितेश शिंदे, उपाध्यक्ष शिवा शिंदे, ओमकार पय्येवाल, पियुष कंचनकर, सचिव राहुल सरदे आदींसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मूर्ती साकारण्यासाठी सहकार्य केले. मंडळप्रमुख सन्नी पारसवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पूर्ण करण्यात आला. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT