छत्रपती संभाजीनगर

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार;

CD
न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव परभणी, ता. २२ : न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा १७ सप्टेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल, कल्याणनगर, परभणी येथे उत्साहात पार पडला. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादरानी, जिल्हा न्यायाधीश त्रिभुवन, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यंगडे आणि मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. वर्मा उपस्थित होते. यावेळी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी या सत्कार सोहळ्यातून प्रेरणा घेऊन जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर उच्च शिक्षण घेऊन विविध मोठ्या पदांवर कार्यरत व्हावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास राजकुमार गायके, संजय वाघमारे, भारत खांडे, प्रमोद कदम, अमृत कदम, बाबूराव राठोड, शिवकुमार नळगीरकर, नरंगले, कांबळे, संतोष वाडेकर, साहेबराव जोंधळे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन अमृतराव कदम यांनी केले. पुरुषोत्तम बोरवंडकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rani Mukherjee Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक! कृष्णा मुखर्जींचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

SCROLL FOR NEXT