छत्रपती संभाजीनगर

१४ वर्षांखालील विभागीय कबड्डी स्पर्धेत वयाच्या बनावट कागदपत्रांचा आरोप! खेळाडूंची वय पडताळणी चाचणी घेण्याची मागणी; दोषींवर कारवाई करण्यासाठी क्रीडा विभागाला निवेदन.

CD
विभागीय कबड्डीत ‘बोगस’ खेळाडूंच्या सहभागाचा आरोप पैठण, ता. १४ (बातमीदार) : हिंगोली येथे झालेल्या १४ वर्षांखालील विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत तेथील जिल्हा संघातील काही खेळाडूंनी बनावट कागदपत्रांच्या आधारे वय कमी दाखवून सहभाग घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व संशयित खेळाडूंची वैद्यकीय वय पडताळणी चाचणी घ्यावी, अशी मागणी पैठणच्या भीमाशंकर विद्यालयाचे सहशिक्षक एस.के. बदर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शालेय क्रीडा स्पर्धांतर्गत ही विभागीय स्पर्धा २६ व २७ ऑक्टोबर रोजी डिग्रस फाटा (हिंगोली) येथे पार पडली. संबंधित खेळाडूंचे वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करत, डीएसओ पोर्टलवरील नोंदी व पुरावे क्रीडा उपसंचालक (छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे सादर केले आहेत. गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित शाळा व क्रीडा शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून, याच्या प्रती क्रीडा संचालनालय (पुणे) येथेही पाठवण्यात आल्या आहेत. प्रतिक्रिया वयोमर्यादेचे उल्लंघन करून अधिक वयाचे खेळाडू खेळवणे हा पात्र व होतकरू खेळाडूंवर घोर अन्याय आहे. या प्रकरणाची निष्पक्ष तपासणी करून खऱ्या खेळाडूंना न्याय द्यावा. - एस. के. बदर, सहशिक्षक, भीमाशंकर विद्यालय प्रतिक्रिया केवळ शाळेच्या प्रतिष्ठेसाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अशा बोगस खेळाडूंना मैदानात उतरवू नये. क्रीडा विभागाने न्याय दिला नाही, तर आम्ही न्यायालयात कायदेशीर लढा देऊ. - स्वप्नील चाळक, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी! लोणार सरोवराला 'जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा' दर्जा; ठरलं भारतातील दुसरं ठिकाण

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

SCROLL FOR NEXT