छत्रपती संभाजीनगर

दुष्काळाच्या झळा रब्बी हंगामालाही; बियाणे विक्री ठप्प!:

CD
पाण्याअभावी कळंबमध्ये रब्बीची पेरणी ठप्प! बियाण्यांच्या विक्रीला प्रतिसाद नाही, एक लाख हेक्टर पेरणीविना राहण्याची शक्यता ----- कळंब, ता. ११ (बातमीदार) : यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्रोत आटू लागल्याने रब्बी हंगामातील संकट गडद झाले आहे. पिकांना पाणी मिळण्याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे तालुक्यातील एक लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहण्याची शक्यता आहे. याचे पडसाद कृषी सेवा केंद्रांमध्येही उमटू लागले असून, गहू आणि हरभऱ्याच्या बियाण्यांची विक्री अद्याप सुरू झालेली नाही. साधारणपणे सोयाबीनची काढणी पूर्ण होताच शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागतात. गहू, हरभरा आणि ज्वारीच्या पेरणीसाठी बियाणे खरेदी, मशागत आणि पाण्याचे नियोजन सुरू होते. यंदा मात्र या हालचाली मंदावल्या आहेत. पेरणीची इच्छा असूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल की नाही, याची खात्री नसल्याने शेतकरी निर्णय घेण्यास धजावत नाहीत. ----- पेरणी कशाच्या भरवशावर? पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून, विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. काही ठिकाणी जलस्रोत कोरडे पडल्याने रब्बी पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गहू आणि हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर पाणी मिळाले नाही, तर बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. ----- कृषी सेवा केंद्रांमध्ये शुकशुकाट दरवर्षी रब्बी हंगामाच्या सुरवातीला कृषी सेवा केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. गहू आणि हरभऱ्याच्या बियाण्यांना मागणी नसल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. काही केंद्रांमध्ये बियाण्यांची एकही पिशवी विकली गेलेली नाही. ----- रब्बीवरही संकट खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि सिंचनासाठी पाण्याची अनिश्चितता अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. खरिपामधून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही आणि आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची भीती आहे. पेरणी केली तर पाणी मिळण्याची खात्री नाही आणि पेरणी टाळली तर उत्पन्नाचे आणखी एक साधन बंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT