छत्रपती संभाजीनगर

कन्नड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य कन्नड तालुक्यात ४ हजार ४१६ कामांचे नियोजन; रोजगारनिर्मितीवर भर

CD
कन्नडमधील स्थलांतराला लागणार ‘ब्रेक’ - दुष्काळी स्थितीत तालुक्यात ४,४१६ जलसंधारण कामांचे नियोजन कन्नड, ता.२८ (बातमीदार) : खरीप हंगामात पावसाने दिलेली प्रदीर्घ ओढ आणि मोठ्या तुटीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाची पहिली घंटा (ट्रिगर-१) वाजली आहे. या गंभीर संकटामुळे ग्रामीण भागात शेतकरी आणि शेतमजुरांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, प्रशासनाने मजुरांचे शहरांकडे होणारे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी कंबर कसली आहे. ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियाना’अंतर्गत (ग्रामीण) कन्नड तालुक्यात मृद व जलसंधारणाच्या तब्बल ४ हजार ४१६ कामांचे भव्य नियोजन केले आहे. या मोहिमेमुळे एका बाजूला दुष्काळात हातांना शाश्वत काम मिळणार असून, दुसऱ्या बाजूला आगामी टंचाईवर मात करण्यासाठी भूजलपातळी वाढवण्यास मोठा हातभार लागणार आहे. या संदर्भातील मंजुरीचे अधिकृत पत्र उपजिल्हाधिकारी (रोहयो) रूपेश सिंगारे आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सोनार यांनी पंचायत समिती प्रशासनाला पाठविले आहे. यंदा भूजलपातळी खालावल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पारंपरिक बंधाऱ्यांसोबतच बोअरवेल व विहिरींमध्ये वाळू भरून भूजल पुनर्भरणाची शेकडो कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे जलसंधारणाला नवी दिशा मिळण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संसाराला रोजगाराचा मोठा आधार मिळणार आहे. चौकट कामांची यादी लागणार फलकावर केवळ कागदावर नियोजन न राहता प्रत्यक्ष गरजेनुसार कामे व्हावीत, यासाठी ग्रामपंचायतींना गावात प्रत्यक्ष ‘शिवारफेरी’ करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिकांना सोबत घेऊन चेकडॅम, पाझर तलाव, नाला पुनरुज्जीवन, पुनर्भरण खड्डे आणि विहिरींच्या पुनर्भरणाची ठिकाणे निश्चित केली जातील. या कामांची तांत्रिक व्यवहार्यता पडताळून त्यांची अधिकृत नोंद ‘युक्तधारा’ संकेतस्थळावर केली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाने अनुज्ञेय केलेल्या ३७५ प्रकारच्या कामांची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फलकावर झळकणार असून, नुकत्याच पार पडलेल्या विशेष ग्रामसभांमध्ये या कामांना मंजुरी दिली आहे. चौकट असे असेल स्वरूप - भूजल पुनर्भरण (बोअरवेल व विहीर) : १,३९० - पुनर्भरण खड्डे व बांबू लागवड : १,३९० - सलग समोच्च चर (सीसीटी) : ४१७ - नवीन सिंचन विहिरी : २७८ - दगडी, मातीचे व गॅबियन बंधारे : ४१७ - नदी-नाले व पाझर तलाव पुनरुज्जीवन : ३८४ - वृक्षलागवड, कृषी वनीकरण : १४० - एकूण नियोजित कामे : ४,४१६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT