arrested esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : अॕटो पार्टसची चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एक जण फरार : एक लाखाहून अधिक किमती मुद्देमाल गेला चोरीला

सकाळ वृत्तसेवा

कन्नडः विविध मोटारसायकलीचे (ऑटो) स्पेअर पार्ट (सुटे भाग) ठेवलेल्या गोडाऊनवजा घरातून ऑटो पार्टसची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना कन्नड शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१) अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे.

पोलिसांनी वैभव गोरक्षनाथ गरुड (वय २४, रा.कनकावती नगर,कन्नड) शुभम अशोक कणसे (वय २२, या दोघांना अटक केली. तर संकेत बनसोडे (वय २५) हा पेंटर फरार झाला आहे.कन्नड शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील नितीन नगर येथील इम्रान मोहसीन शेख यांचे चाळीसगाव रस्त्यावर गिरणी ग्राउंडसमोर ऑटो पार्टसचे दुकान आहे. दुकानासाठी लागणारे साहित्य साठवून ठेवण्यासाठी, त्यांनी हिवरखेडा रस्त्यावरील वाणी मंगल कार्यालयाजवळ सचिन येवले यांचे घर भाड्याने घेतले आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुकानासाठी काही साहित्य काढले आणि घराला कुलूप लावून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता ते पुन्हा काही साहित्य आणण्यासाठी गेले असता, त्यांना त्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहणी केली असता, दुकानातून कंपनीचे वेगवेगळ्या मोटारसायकलचे १२४ पिस्टन (किंमत अंदाजे ९३,७४०), विविध कंपन्यांच्या दुचाकीचे वॉल बॉक्स (किंमत अंदाजे ७,७००) आदी साहित्य असा एकूण १ लाख ११ हजार २९६ रुपयांचा माल चोरी गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

एक दिवसाची पोलिस कोठडी

या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलिस निरीक्षक सचिन खटके यांनी वैभव गरुड, शुभम कणसे यांना अटक केली. संकेत बनसोडे हा फरार झाला. अटक केलेल्या दोघांना कन्नड न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. आरोपींकडून पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेण्यात असून अधिक तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन खटके हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT