छत्रपती संभाजीनगर

कारेगाव रस्त्यावर गतीरोधक, पथदिवे लावण्याची मागणी

CD
कारेगाव रस्त्यावर गतीरोधक, पथदिवे बसवण्याची मागणी --------- भाजप नगरसेवकांची सा.बां.विभागकडे मागणी सकाळ वृत्तसेवा परभणी,ता. १२ ः नव्याने बांधण्यात आलेल्या कारेगाव रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक टाकावेत, पथदिवे लावावेत, उघडा महादेव मंदिराजवळ अपूर्ण रस्ता पूर्ण करुन द्यावा अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. या प्रकरणी प्रभाग क्रमांक चार, पाचच्या नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. कारेगाव रस्त्यावर अनेक शाळा व खासगी कोचिंग क्लासेस आहेत. रोज हजारो विद्यार्थी ये-जा करतात. त्यातच काही जण आपली वाहने सुसाट पळवतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण कार्यालयाजवळ व न्यायधीश निवासस्थानासमोर तत्काळ रबरी-लोखंडी गतीरोधक लावावेत, याच रस्त्यावर उघडा महादेव मंदिराजवळ रस्त्याचा ५० मिटरचा तुकडा बांधकाम न करता तसाच सोडून देण्यात आला आहे. तेथे सध्या मोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. तो रस्ता तात्काळ करुन द्यावा. या रस्त्यावर बंद असलेले पथदिवे तत्काळ लावावेत. सात दिवसात हि कामे पूर्ण करावीत अन्यथा आपल्या कार्यालयासमोर सर्व नगरसेवक, पालक विद्यार्ती बोंब मारो आंदोलन करतील असा इशारा नगरसेवक विश्वजीत बुधवंत, रितेश जैन, बबलू टाक, सपना जुकटे, मिनाताई वरपुडकर, गिरीजा शंकर आजेगावकर यांनी दिला आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT