ABD26J78396
ओळ ः नर्मदेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या कावड यात्रेत सहभागी भाविक.
--
महादेव, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
वर्धापन दिनानिमित्त कावड यात्रा
----
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः श्रावण मासानिमित्त नर्मदेश्वर महादेव व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विष्णुनगर, लिमयेवाडी व मित्रनगर परिसरात कावड यात्रा काढण्यात आली.
या यात्रेत समुद्र, ओंकारेश्वर, रामेश्वर, पंढरपूर, पैठण, काशी, ब्रह्मगिरी, गोमती नदी, चारधाम, पंचकुंड, शरयू, हनुमान झरा, गंगासागर, सोरटी सोमनाथ, हरिद्वार व ऋषिकेश आदी तीर्थक्षेत्रांतील पवित्र जल भगवान शंकराला अर्पण करण्यात आले. कावड यात्रा ही भगवान शंकरावरील भक्ती व श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. यात्रेतील संयम, श्रद्धा व कठोर साधनेतून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक विकासाला प्रोत्साहन मिळते. राधाकृष्ण गायकवाड यांच्या संकल्पनेतून या ही कावड यात्रा काढण्यात आली. यात्रेत माहेश्वरी मंडळ (बालाजीनगर प्रभाग), स्वामी विवेकानंद प्रभाग शाखा (विष्णुनगर), श्रीरामकृष्ण हरी सेवा मंडळ, श्रीरामकृष्ण हरी महिला भजनी मंडळ, श्रीजानकी महिला भजनी मंडळ, श्रीरामेश्वर महिला भजनी मंडळ, श्रीदुर्गा माता महिला भजनी मंडळ, श्रीआदर्श महिला भजनी मंडळ, श्रीविठ्ठल-रुखमाई महिला भजनी मंडळ आणि श्रीभोलेश्वर महिला भजनी मंडळ यांनी सहभाग नोंदविला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.