छत्रपती संभाजीनगर

हातात आलेली पिके करपली

CD
हातात आलेली पिके करपली पावसाच्या दडीमुळे केसरजवळगाचे शेतकरी संकटात केसरजवळगा, ता. २१ (बातमीदार) : केसरजवळगा परिसरासह आलूर, वरणाळ, बेळंब व कोथळी परिसरात पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठी वाताहत झाली आहे. जून-जुलै महिन्यातील सुरवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग व उडदाची पेरणी केली होती. मात्र, पीक वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील उभी पिके डोळ्यांसमोर करपून गेली आहेत. बियाणे, खते, मशागत व फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही हातात काहीच पडणार नसल्याने शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. पीक काढणीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने ''खर्च जास्त आणि उत्पन्न शून्य'' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यास खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...... ((कोट)) गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने ताण दिल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. शासनाने उशीर न करता तातडीने दुष्काळसदृश मदत जाहीर करावी. - अभिजित घाळे, शेतकरी ..... (कोट)) उमरगा तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मुरूम महसूल मंडळातील कोरड्या दुष्काळाची दाहकता वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. - लोकेश बिराजदार, तालुका सरचिटणीस, भाजप ....... (कोट)) पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने हेक्टरी किमान ७० हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी. - बलभीम पटवारी, माजी सरपंच ....... केसरजवळगा ः पावसाने दडी मारल्यामुळे उभे सोयाबीन पीक शेंगाविना जमिनीवरच करपून गेले आहे. ..... फोटो क्रमांक ः OSM26B07045

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ACB Action: मोफत कायदेशीर मदतीच्या नावाखाली लाचखोरी! वकील ताब्यात, पत्नीविरोधातही गुन्हा; एसीबीने रंगेहाथ पकडलं

Maharashtra Village Diwali Bonus: महाराष्ट्रातील 'या' गावाची कमाल! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; विकासाच्या जोरावर देशभर डंका

Lavrov Deepfake: बनावट व्हिडिओमुळे प्रशांत भूषण अडचणीत; दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

ना हिरो, ना खलनायक; महेश कोठारेंच्या 'माझा छकुला' मध्ये हमाल म्हणून दिसलेले सचिन गोस्वामी; कशी मिळालेली भूमिका? म्हणाले-

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोने लुटले; उत्तर प्रदेशातील टोळीला मकोका

SCROLL FOR NEXT