केसरजवळग्यातील विद्यार्थ्यांची गरुडझेप
जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत १६ पदकांची कमाई
केसरजवळगा, ता. ७ (बातमीदार) ः सीमावर्ती भागातील महात्मा गांधी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत पहिल्याच वर्षी कौतुकास्पद यश संपादन केले आहे. जिद्द, नियोजन आणि सलग १०१ दिवसांच्या सरावाच्या बळावर तब्बल १६ पदके (१ सुवर्ण, १४ रौप्य, १ कांस्य) पटकावली. यापैकी दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी ट्रेडिशनल, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक योगा प्रकारात हे यश मिळवले. १७ वर्षे मुलांच्या आर्टिस्टिक पेअर गटात अरफान नाजीमअली शेख व मशाक अब्दुल जूनोदी यांनी सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेत धडक मारली. याशिवाय आराध्या यलगोंडे, दीपिका घोडके, प्रणिता घोडके, सोहम भुरे, चैतन्य बिराजदार, स्वाती पालापूरे, श्रद्धा देवकर, पूर्वी राजपूत, समर्थ गुरव तसेच यापूर्वीच्या असोसिएशन स्पर्धेतील अल्फिया पटेल व संस्कृती राजपूत यांनी पदकांची कमाई केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनापासून दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत सलग १०१ दिवस घेतलेल्या विशेष सरावाचे हे फलित आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आर. एस. भुरे, योग पंच सुरेंद्र वाले आणि मुनीरपाशा शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक डी. बी. बणजगोळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे एस. के. भुरे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.