छत्रपती संभाजीनगर

केशलोंच म्हणजे आत्मशुद्धी आणि संयमाचा मार्ग

CD
केशलोचन म्हणजे आत्मशुद्धी आणि संयमाचा मार्ग आर्यनंदी कॉलनीत आचार्य हेमसागर महाराजांचा केशलोचन विधी छत्रपती संभाजीनगर : आर्यनंदी कॉलनी, वेदांतनगर येथे चातुर्मासासाठी विराजमान असलेले आचार्य १०८ हेमसागरजी गुरुदेव यांचा शुक्रवारी (ता. ३०) सकाळी केशलोचन विधी भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी भगवान जिनेंद्रांचा पंचामृत अभिषेक केला. जैन श्रावक-श्राविकांनी उपस्थित राहून धर्मलाभ घेतला. जैन धर्मात केशलोचन या विधीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. साधुसंत स्वतःच्या हातांनी डोक्यावरील केस काढतात. हा विधी केवळ बाह्य त्याग नसून देहाविषयीची आसक्ती, सुखसुविधांची अपेक्षा आणि मोह यांचा त्याग करण्याचे प्रतीक मानला जातो. केशलोचनाच्या वेळी होणाऱ्या शारीरिक वेदना समभावाने सहन करून साधक सहनशीलता, धैर्य आणि आत्मसंयमाचा आदर्श समाजासमोर ठेवतात. प्रवचनातून संयम आणि आत्मकल्याणाचा संदेश आचार्यश्रींच्या चातुर्मासाच्या निमित्ताने धर्म, त्याग, तपश्चर्या आणि आत्मकल्याणाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. जैन तत्त्वज्ञानानुसार, शरीर नश्वर असून आत्मा शाश्वत आहे. त्यामुळे मनुष्याने बाह्य सौंदर्यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता, राग-द्वेषाचा त्याग आणि सम्यक आचरण यांना अधिक महत्त्व द्यावे. तपश्चर्या ही केवळ शारीरिक कष्टांची प्रक्रिया नसून मनातील विकारांवर विजय मिळविण्याचा मार्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT