छत्रपती संभाजीनगर

खरीप पिकांच्या ६५ टक्के कापणी प्रयोगांची पूर्तता पीकविमा आणि उत्पादकतेच्या अचूक नोंदीसाठी ठरणार आधार

CD
खरीप पिकांच्या ६५ टक्के पीककापणी प्रयोगांची पूर्तता पीकविमा, उत्पादकतेच्या अचूक नोंदीसाठी ठरणार आधार सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता.२१ ः नैसर्गिक आपत्ती आणि पावसाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून शेतकऱ्यांना पीकविम्याचे योग्य कवच मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ अंतर्गत पीककापणी प्रयोगांची मोहीम वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात नियोजित एक हजार ४०९ प्रयोगांपैकी गुरुवारपर्यंत (ता. १५) ९१९ म्हणजेच ६५.२ टक्के प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, उर्वरित प्रयोगांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्यक्ष उत्पादनाची शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी पीककापणी प्रयोगांद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारेच पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत उंबरठा उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्पादन यांची तुलना करून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई निश्चित केली जाते. पीककापणी प्रयोग ही केवळ प्रशासकीय बाब नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि प्रत्यक्ष उत्पादनाचे योग्य मूल्यमापन करणारी प्रणाली आहे. निवडलेल्या शेतातील ठरावीक क्षेत्रातील पिकाची कापणी करून प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित केली जाते. या माहितीचा उपयोग केवळ पीकविम्यासाठीच नव्हे, तर जिल्ह्याचे कृषी उत्पादनाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी, भविष्यातील कृषी नियोजनासाठी आणि शासनाला वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देण्यासाठी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ...................... ((पॉईंटर)) पीकनिहाय कापणी प्रयोगांची सद्यःस्थिती कृषी व महसूल प्रशासनामार्फत जिल्ह्यात बाजरी, मका, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस आणि खरीप कांदा अशा आठ प्रमुख पिकांसाठी कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले आहे. - बाजरी : नियोजित २ पैकी २ प्रयोग पूर्ण. - सोयाबीन : ५०३ पैकी ३८७ प्रयोग पूर्ण. - उडीद: ३१२ पैकी २८८ प्रयोग पूर्ण. - मूग: २४८ पैकी २३७ प्रयोग पूर्ण. - मका: २८ पैकी ५ प्रयोग पूर्ण. ............... ((चौकट)) तूर, कापूस व खरीप कांदा तुरीचे २२४, कापसाचे २ व कांद्याचे ९० पीककापणी प्रयोग होणार असून, या पिकांची काढणी आगामी काळात होणार असल्याने या प्रयोगांची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘या घरात तुझ्या कार्यासाठी येईन असं वाटलं नव्हतं…’ नाना पाटेकरांच्या पुतण्याची पोस्ट चर्चेत; फार्म हाऊसमधील फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : चार ते पाच महिन्यांत देशात काहीतरी मोठं घडणार, राज ठाकरेंचा दावा

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

SCROLL FOR NEXT