छत्रपती संभाजीनगर

गोकुळाष्टमीनिमित्त खाटू श्याम बाबांचा पायी पालखी सोहळा उत्साहात संपन्न

CD
ABD26J78833 गंगापूर जहागीर ः कृष्णपूरवाडी येथे निघालेल्या पायी पालखी सोहळ्यात सहभागी भाविक. गोकुळाष्टमीनिमित्त खाटूश्याम बाबांचा पालखी सोहळा गंगापूर जहागीर, ता. ७ (बातमीदार) : गोकुळाष्टमीनिमित्त श्री श्याम बाबा सेवा समिती, अक्षद सुपर सिटी, गंगापूर जहागीर यांच्यातर्फे शुक्रवारी (ता. चार) खाटूश्याम बाबांचा पायी पालखी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. महाराष्ट्रात प्रथमच खाटूश्याम बाबांची पायी पालखी कृष्णपूरवाडी येथे नेण्यात आली. सोहळ्यास छत्रपती संभाजीनगर शहर सुधार समितीचे सभापती तथा प्रभाग क्र. ८ चे नगरसेवक रामदास हरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच खाटूश्याम बाबा मंदिर, कृष्णपूरवाडीचे ट्रस्टी किरण दौंड पाटील, सरपंच नामदेव भावले उपसरपंच विजय गायके, राजमाता इंग्लिश स्कूलचे संस्थापक संदीप दहीहंडे, यशोदीप वानखेडे, सुरेश गव्हाणे, किरण मिसाळ, गजानन वीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. फुलांनी सजविलेल्या पालखीसमोर भाविकांनी ‘जय श्री श्याम’चा जयघोष करत सहभाग नोंदविला. भजन, कीर्तन व भक्तिगीतांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून पुष्पवृष्टी व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात परिसरातील महिला, पुरुष, युवक व नागरिकांनी सहभाग घेतला. आयोजक मारोती लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री श्याम बाबा सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

SCROLL FOR NEXT