high court high court
छत्रपती संभाजीनगर

दुषित पाणीपुरवठा: राज्यशासन, विभागीय आयुक्त, सीओंना नोटीस

याचिकेत मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाचे न्‍या. एस. व्‍ही. गंगापूरवाला आणि न्‍या. आर. एन. लड्डा यांनी प्रतिवाद्यांना नोटीसा बजावण्‍याचे आदेश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी १३ ऑगस्‍टरोजी ठेवली आहे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: गेल्या काही महिन्‍यांपासून खुलताबाद शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत जनहित याचिका दाखल झाली आहे. याचिकेत मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाचे न्‍या. एस. व्‍ही. गंगापूरवाला आणि न्‍या. आर. एन. लड्डा यांनी प्रतिवाद्यांना नोटीसा बजावण्‍याचे आदेश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी १३ ऑगस्‍टरोजी ठेवली आहे.

खुलताबाद येथील रहिवसी शेख अब्दुल माजीद अब्दुल महेमुद यांनी अॅड. सुरज गोठवाल यांच्यामार्फत सदर जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, शहरात काही महिन्‍यांपासून दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. दुषित पाण्‍याचे नमुने सार्वजनिक आरोग्य सेवा यांच्‍या प्रादेशीक आरोग्य प्रयोग शाळेकडे पाठविण्‍यात आले होते. त्‍यावर १८ एप्रिल २०२१ रोजी पाणी पिण्‍यास योग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. याबाबत स्‍थानिक नागरिकांनी खुलताबाद नगर परिषदेसह इतर वरिष्‍ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्‍याचा काही फायदा झाला नाही.

याचिकेच्‍या प्राथमिक सुनावणीनंतर खंडपीठाने मुख्‍य सचिव, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्‍हाधिकारी, खुलताबाद नगर परिषदेचे अध्‍यक्ष यांना नोटीस बजावण्‍याचे आदेश दिले. याचिकेत, अॅड. गोठवाल यांना अॅड. रुपाली गोठवाल (राजपुत), अॅड. साईसागर अंबिलवादे यांनी सहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT