छत्रपती संभाजीनगर

धमकी देवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले

CD
अर्ज माघारीसाठी अपहरण, धमक्याही ------------- जिल्हा बँक निवडणूक; एका उमेदवारासह दहा जणांवर गुन्हा सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २९ ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचे अपहरण करून त्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, ठार मारण्याची धमकी, आदींवरून येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात या निवडणुकीतील एका उमेदवाराच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या निवडणुकीत रेणापूर तालुक्यातून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रवी धनराज जाधव यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत, ‘उमेदवारी दाखल केल्यापासून याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सर्वेराव मोरे व शरद कदम हे आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात सातत्याने दबाव टाकत होते. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाला विशालनगर येथे असताना शरद कदम यांनी मला दयानंद गेटला बोलावून घेतले. तेथून त्यांनी एका कारमध्ये बसवून एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव मोरे व काही व्यक्ती अगोदरच उपस्थित होत्या. त्यानंतर पैसे घे, उमदेवारी मागे घे अन्यथा कुटुंबीयाला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी आपल्याला देण्यात आल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. त्यानंतर आपल्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवून जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. तेथेही आपल्याला धमकी देण्यात आली. त्यानंतर जबरदस्तीने उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज भरायला लावून जबरदस्तीने त्यावर सही करण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा मला गाडीत बसवून औसा रस्त्यावर नेण्यात आले. तेथून दुसऱ्या एका हॉटेलमध्ये एका खोलीत आणून बसवले. रात्री अकराच्या नंतर खोलीतून मी बाहेर पडून मित्रांना याची माहिती दिल्याचे जाधव यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. यात अपहरण करणे, डांबून ठेवणे, धमकावणे, आमिष दाखवणे आदींवरून सर्जेराव मोरे, शरद कदम यांच्यासह जाधव यांच्या फिर्यादीवरून दहा जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'नविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट दिलं, तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?'; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना सवाल, थेट पुराव्यासह उघड केली जुनी बात

Pradeep Purnekar Case: ''तुम्ही पळून गेलात, तुमच्यात हिंमत नाही..'', पूर्णेकर हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संताप, पोलिस तपासावरही आक्षेप

Latest Marathi News Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला नोटीस

Comscore रिपोर्टमध्ये ई-सकाळ महाराष्ट्रातील नंबर 1 डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म; 5.5 कोटींहून अधिक युनिक व्हिजिटर्स

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

SCROLL FOR NEXT