छत्रपती संभाजीनगर

मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडत विद्यार्थ्यांनी साकारले किल्ले

CD
मोबाइलच्या दुनियेतून बाहेर पडत विद्यार्थ्यांनी साकारले किल्ले श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये किल्लोत्सव; २०० विद्यार्थ्यांचा सहभाग ------------- धाराशिव, ता. ६ (बातमीदार) : दिवाळीनिमित्त शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. मोबाइलच्या दुनियेत रमणारी मुले प्रत्यक्ष मैदानात उतरून आनंदाने किल्ले बनवित असल्याचे उत्साहवर्धक चित्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य सुधीर पाटील यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त ‘किल्लोत्सव’ या किल्ले बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या किल्लोत्सवाचे उद्‍घाटन आदित्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे, तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे संचालक संतोष कुलकर्णी, अधीक्षक बालाजी घोलप, मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, बालाजी गोरे आणि शेषनाथ वाघ यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत पहिली ते चौथी या पहिल्या गटातून समर्थ कुलकर्णी (आर्य चाणक्य शाळा) आणि शर्वरी मुळे (नूतन विद्यामंदिर) यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. पाचवी ते सातवी या दुसऱ्या गटात गौरी कोकाटे, पायल आलगडे, कार्तिकी दराडे, अमीरा मशायक, वैष्णवी भुजंगे, श्रेयश काळे, गणेश कारंडे, आर्यन बनसोडे, शौर्य कदम, सुजल भोसले आणि ऋतुराज वागदकर यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. तसेच श्रीपतराव भोसले हायस्कूलचे राजवर्धन कोरके, धनुष्य तीर्थकर, पुरुषोत्तम देशमुखे आणि प्रणव भंडारे यांनाही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सुनील कोरडे यांनी केले. किल्लोत्सवाचे स्पर्धाप्रमुख शेषनाथ वाघ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR Update: मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील मतदारांना पुन्हा मिळणार संधी

CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

५० हजार लोक, घोड्यावर बसलेली रेखा खाली कोसळली! अख्खा स्टेडियम चिडीचूप, दिग्दर्शकाने ३५ वर्षांनी सांगितला किस्सा

Israel PM Race: नेतन्याहू यांच्याऐवजी आयझेनकोट इस्रायलचे नवे पंतप्रधान बनणार का? अरब पक्षांनी दिला पाठिंबा; पण नेमका पेच काय?

Latest Marathi News Update : ग्रामसेवकाच्या मनमानीमुळे निधी रखडल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT