छत्रपती संभाजीनगर

किनवट एसटी आगाराच्या दारात अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट!

CD
ABD26J82657 किनवटमध्ये प्रवाशांची पळवापळवी! ---- बस आगाराच्या दारात अवैध प्रवासी वाहतुकीचा सुळसुळाट ---- शुभम शिंदे गोकुंदा, ता.३ : एसटी महामंडळाचा तोटा कमी करून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एकीकडे विविध योजना राबविल्या जात आहेत. महिलांना अर्धे तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आणि सुरक्षित प्रवासाच्या सुविधा देऊन प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, किनवट आगाराच्या प्रवेशद्वारावरच अवैध प्रवासी वाहतुकीचा खुलेआम व्यवसाय सुरू असल्याने एसटी महामंडळाच्या प्रयत्नांना आगारातूनच खीळ बसत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार आगार परिसरात सुरू असताना त्यावर प्रभावी नियंत्रण का मिळवता येत नाही, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. किनवट आगाराबाहेर खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांना आवाज देऊन वाहनांमध्ये बसविले जाते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये कोंबून वाहतूक केली जाते. एसटी बस सुटण्यापूर्वीच खासगी वाहने प्रवासी घेऊन मार्गस्थ होत असल्याने एसटीच्या उत्पन्नाला थेट फटका बसत आहे. एसटीच्या प्रवाशांवर डोळा ठेवून आगाराच्या प्रवेशद्वारावरच खासगी वाहतूकदारांनी आपले जाळे निर्माण केलेले असतानाही आगारप्रमुख बघ्याची भूमिका घेत आहेत. आगारप्रमुखांना याबाबत विचारणा केली असता, अवैध वाहतुकीविरोधात नियमित तक्रारी दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या तक्रारींच्या प्रती मागितल्यानंतर तीन दिवस उलटूनही त्या उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. नियमित तक्रारी केल्या जात असतील, तर त्यांचे पुरावे देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणातील तक्रारींची सत्यता आणि त्यावर झालेली कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासण्याची गरज आहे. ---- एसटी बस निर्धारित वेळेत सुटेना दुसरीकडे एसटीच्या गाड्या निर्धारित वेळेत सुटत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. एसटी वेळेवर उपलब्ध नसताना खासगी वाहनचालक मात्र प्रवासी घेण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे प्रवासी खासगी वाहनांकडे वळत असतील, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. ------ (((कोट)) तक्रारीची प्रत आम्ही तुम्हाला का द्यावी? आजपर्यंत आम्ही ती कधीही कुणाला दिली नाही. -अशोक चव्हाण, आगार प्रमुख, किनवट. --- (((कोट)) तक्रारीची प्रत मी तुम्हाला देऊ शकत नाही. ती तुम्हाला आगारप्रमुखांकडे किंवा पोलिस ठाण्यात मिळेल. -शिलरत्न ढगे, स्थानक प्रमुख, किनवट आगार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT