छत्रपती संभाजीनगर

ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करा : पंकज कुमावत

CD
के.के.एम. महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मानवत ता.३ (बातमीदार)ः जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत के.के.एम. महाविद्यालयात विविध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पन्नालालजी चांडक सभागृहात झाला. यावेळी ३५ गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ५५ हजार ५५५ रुपयांची रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व पुस्तक संच देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, तर यश निश्चित मिळते. मेहनत, शिस्त, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केले. पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रुवार अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष अनिलराव नखाते, सहसचिव विजयकुमार दलाल, सदस्य दिलीपराव हिबारे, दिगंबरराव बारटक्के, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, पर्यवेक्षक एम. एम. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. मुंडे यांनी प्रास्ताविक केले. गुणवंतांना प्रोत्साहन देतानाच इतर विद्यार्थ्यांतही स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे हा उपक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात कत्रुवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. चेतनकुमार व्यास यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जाधव विनायक व विनोद हिबारे यांनी पारितोषिकांचे वाचन केले. डॉ. पंकज चलिकवार यांनी आभार मानले. प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

SBI ATM Rule: 1 ऑक्टोबरपासून ATMच्या नियमांत मोठा बदल! नियम समजून घ्या, नाहीतर भरावा लागेल चार्ज

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग, निकृष्ट कामावर उपमहापौरांचा दणका; सॅम्पल तपासणीचे निर्देश, बिल न काढण्याची सूचना

Mumbai-Goa Highway : पुढील 6 महिन्यांत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार! गणेशोत्सवाआधी 'हा' महत्त्वाचा पूल प्रवाशांच्या सेवेत; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT