Health_Insurance
Health_Insurance 
छत्रपती संभाजीनगर

आरोग्यासाठी बचत कशी कराल, त्यासाठी हे वाचायलाच हवे

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनामुळे आज प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याविषयी अलर्ट झाला. यासाठी स्वत: बरोबर कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजना करू लागले आहेत. प्रामुख्याने आता आरोग्य विमा घेण्याकडे कल वाढत आहे. यासाठी एलआयसीपासून ते खासगी कंपन्यांकडे पॉलिसीबाबत विचारणा केली जात आहे. यात कमी प्रीमियममध्ये जास्त फायदा असलेल्या प्लॅनविषयी विचारणा होत आहे.

जिल्ह्यात हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. कोरोनाने प्रत्येकाचे डोळे उघडले आहे. यामुळे प्रत्येकजण आरोग्य, बचतीकडे विशेष लक्ष देत उद्याची चिंता करू लागला आहे. यामुळे हेल्थ पॉलिसी घेण्याकडे कल लॉकडाउन पूर्वीपेक्षा वाढत आहे. हे प्रमाण शहरात सर्वाधिक आहे. विमा क्षेत्रात शंभरहून अधिक विविध प्रकारच्या कंपन्या आहेत. त्यातील खासगी विमा कंपन्यांनी तर कोरोनाच्या अनुषंगाने कोरोनारक्षक व कोरोना कवच अशा वेगवेगळ्या पॉलिसी काढल्या आहेत.

साधारणतः तीन ते पाच हजारांचे प्रीमियम यासाठी आकारण्यात येत आहेत. लॉकडाउन काळात हेल्थ पॉलिसी घेणाऱ्यांचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांनी वाढले आहे. शहर व जिल्ह्याची लोकसंख्या ५० लाखांच्या आसपास आहे. त्यापैकी ३० ते ३५ टक्के लोकांनी वैयक्तिक आरोग्य विमा काढला आहे. जवळपास २० ते ३० टक्के लोकांना ईएसआय लागू आहे. अजूनही ३० ते ४० टक्के लोकांकडे आरोग्य विमा नाही. तर जवळपास जिल्ह्यातील ७० ते ८० टक्के लोकांची एलआयसीची छोटी-मोठी पॉलिसी काढली आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कंपनीतर्फे ग्रुप इन्शुरन्स काढण्यात आले आहे. काही कंपन्यांनी कोविडच्या अनुषंगानेही विमा कवच कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

पंतप्रधान विमा संरक्षणाकडे दुर्लक्ष
केंद्र सरकारतर्फे प्रत्येकाला विमा संरक्षण मिळावे यासाठी २०१५ मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जाहीर केल्या. दोन्ही योजनेच्या माध्यमातून चार लाखांचे विमा संरक्षण देण्यात येत आहे. यातील प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ३३० रुपये व सेवाकर भरून दोन लाख रुपयांचा विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत केवळ १२ रुपये भरून दोन लाखांचा विमा संरक्षण मिळते. या दोन्ही योजनांना जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ ५० लाख लोकांपैकी केवळ एक लाख ४६ हजार तर १२ रुपयांच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा केवळ तीन लाख २४ हजार नागरिकांनीच लाभ घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एक लाख आठ हजारांची वाढ झाल्याची माहिती बॅंकिंग अभ्यासक क्रांतीकुमार देशपांडे यांनी दिली.

पेन्शन फंडाचे आमिष दाखवत माजी कनिष्ठ अभियंत्याला महिलांनी घातला एक लाखाचा गंडा 

फसवणूक होण्याची शक्यता
हेल्थ प्लॅन घेताना त्यातील सर्व बारकाव्यांचा अभ्यास करूनच घेतला पाहिजे अन्यथा आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळेच खासगीप्रमाणेच सरकारी विमा योजनांना अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे. अवघ्या ४३५ रुपयांचे प्रीमियम भरून १० लाख रुपयांपर्यंत (वैयक्तिक अपघात विमा) सरकारी हेल्थ इन्शुरन्‍स मिळतो. ही इन्शुरन्स एक जानेवारी ते ३१ मार्च याच दरम्यान मिळते. सर्वसामान्यांना परवडेल असा हा प्लॅन विमा सल्लागारांकडून अथवा सरकरी विमा कंपनीकडून खरेदी करता येतो.


कोरोनामुळे चांगले आरोग्य ठेवणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात दवाखान्याचा किती खर्च लागेल हे सांगता येत नाही. पॉलिसी नसेल तर आपली सर्व जमापुंजी दवाखान्यात खर्च करावी लागते, अशा अनेक केसेस समोर आल्या आहेत. यामुळे हेल्थ प्लॅन आवश्यक असतो.
- विलासराव देशमुख, फायनान्स क्षेत्रातील अभ्यासक

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT