छत्रपती संभाजीनगर

रामेश्वर रूई येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा, किर्तन, दहीहंडी आणि महाप्रसादाचे आयोजन

CD
रामेश्वर रूई येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा ---- कीर्तन, दहीहंडीसह धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन लातूर, ता. २ : तालुक्यातील रामेश्वर (रुई) येथे ता.चार व पाच सप्टेंबर रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन, दहीहंडी आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रामेश्वर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तानी लाभ घेण्याचे आवाहन संत श्री गोपाळ बुवा महाराज शुगर ॲण्ड अ‍ॅग्रो फूड इंडस्ट्रीजचे चेअरमन राजेश कराड यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स् एमआयटी पुणे आणि ग्रामस्थांच्या वतीने भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने रामेश्वर येथे दोन दिवसीय आध्यात्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यानुसार शुक्रवारी (ता.चार) रात्री नऊला अर्जुन महाराज लटपटे यांचे श्रीराम मंदिरात कीर्तन होणार आहे. तर सोहळ्यामध्ये शनिवारी (ता.पाच) विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन येथे सकाळी दहाला कृष्णा महाराज राऊत यांचे कीर्तन होईल. कीर्तनानंतर दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सोहळा रामेश्वरनगरीत साजरा केला जाणार आहे. यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तन सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सरपंच तुळशीराम कराड, शरद पाटील, सरपंच सचिन कराड, कमाल राजेखा पटेल, दशरथ कराड यांनी केले आहे. --------------

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Gokulashtami 2026: मोरपीस ते बासरी! जन्माष्टमीआधी घरात 'या' ५ वस्तू आणणे मानले जाते अत्यंत शुभ; जाणून घ्या वास्तू नियमावली..

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

SCROLL FOR NEXT