छत्रपती संभाजीनगर

कुणबी दाखले वाटपात मराठवाड्यात बीड टॉपवर

CD
पान एक सेकंड लीड ----- कुणबी दाखले वाटपात मराठवाड्यात बीड टॉपवर प्रलंबित अर्जांची संख्या केली शून्यावर; प्रशासनाची गतिमान मोहीम, जात पडताळणीतही जिल्हा अग्रेसर सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १० : मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला प्रशासनाकडून मोठी गती मिळाली असून या संपूर्ण मोहिमेत बीड जिल्ह्याने बाजी मारत मराठवाड्यात अव्वल स्थान पटकावले आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेपासून ते ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत मराठवाड्यात प्राप्त झालेल्या ३ लाख १७ हजार ५६९ अर्जांपैकी ३ लाख १६ हजार ९७७ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप पूर्ण झाले आहे. यात एकट्या बीड जिल्ह्याने २ लाख १० हजार ९३१ दाखले देऊन उर्वरित सर्व जिल्ह्यांना मागे टाकले आहे. मराठवाड्यात प्राप्त झालेल्या एकूण अर्जांपैकी सुमारे ९९.८ टक्के अर्जांचा निपटारा प्रशासनाने अत्यंत गतीने केला आहे. बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्रासाठी तब्बल २ लाख १० हजार ९४१ अर्ज आले होते, त्यांपैकी २ लाख १० हजार ९३१ दाखले वितरित करण्यात आले असून बीड जिल्ह्यात एकही अर्ज प्रलंबित नाही. बीडसोबतच जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांतही एकही अर्ज शिल्लक राहिलेला नाही. केवळ कुणबी दाखलेच नाही, तर जात पडताळणी प्रकरणांतही बीड जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. मराठवाड्यात प्राप्त २१,०५१ जात पडताळणी अर्जांपैकी १६,११० प्रकरणे निकाली निघाली असून, त्यातील एकट्या बीड जिल्ह्यातील ११,४३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ​याशिवाय मराठा समाजाला दिलेल्या १० टक्के एसईबीसी आरक्षणांतर्गत २०२४ ते २०२६ या तीन वर्षांत मराठवाड्यात एकूण २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रांचे वाटप झाले. यामध्ये २०२५ मध्ये सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ४६० दाखले देण्यात आले होते. तीन वर्षांतील एसईबीसी दाखल्यांमध्ये नांदेड (४०,९०१), छत्रपती संभाजीनगर (४७,८२६), बीड (४२,८४३) आणि परभणी (३९,५५८) या जिल्ह्यांत मोठे काम झाले आहे. चौकट मराठवाड्यातील जिल्हाहाय कुणबी प्रमाणपत्र वाटप जिल्हा प्राप्त अर्ज वितरित प्रमाणपत्र ​बीड २,१०,९४१ २,१०,९३१ ​छत्रपती संभाजीनगर २६,०५४ २५,९५८ ​परभणी २०,२४५ २०,१९० ​धाराशिव २०,०५९ १९,७७५ ​जालना १८,७१६ १८,६५३ ​हिंगोली १३,७१३ १३,७०७ ​नांदेड ४,९१७ ४,८९३ ​लातूर २,९२४ २,८७० चौकट कागदपत्रांची शोधमोहीम अन् विशेष शिबिरे ​१ सप्टेंबर २०२५ ते ७ सप्टेंबर २०२६ या अवघ्या एका वर्षाच्या काळात मराठवाड्यात ७७ हजार ९५६ कुणबी दाखले वाटले गेले, यातही बीड जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक म्हणजे ४७ हजार ८०८ एवढा राहिला. जुन्या महसुली, शैक्षणिक व निजामकालीन अभिलेखांमधून वंशावळीची जुळवाजुळव करून संगणकीकृत नोंदी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांना अधिकृत शैक्षणिक व आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी कार्यरत आहे. कोट कुणबी दाखले वाटपात बीड जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे हा प्रशासकीय गतिमानता आणि पारदर्शकतेचा मोठा विजय आहे. जुन्या नोंदी शोधण्यापासून ते अर्जांची पडताळणी करेपर्यंत महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. नागरिकांना कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत आणि एकाही पात्र घटकावर अन्याय होऊ नये, यासाठी आमचे प्राधान्य होते. झिरो पेंडन्सीचे लक्ष्य गाठणाऱ्या संपूर्ण टीमचे हे यश आहे. - विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS: पाकची उडाली झोप! 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात दहशतवादावर सडकून टीका; पहलगाम हल्ल्याचा उल्लेख

बाळाच्या संगोपनासाठी घरात आली मंगल; पण नंतर बदललं सगळंच! ‘अडकित्ता’मध्ये नेमकं काय घडलं? वाचा रिव्ह्यू

Pune Road Inspection: गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात रस्ते दुरुस्तीचा बोजवारा; मिरवणूक मार्गांवर खड्डे, धोकादायक चेंबर अन् फुटपाथ

Palghar Bus Tragedy: शिवशाही बसच्या डिकीचे झाकण उघडताच शेतकरी सुभाष पागींचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Marathi News Live Updates: गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी पुणेकरांची बाजारपेठेत गर्दी

SCROLL FOR NEXT