छत्रपती संभाजीनगर

परभणी जिल्ह्यात १९ हजार ९६१ कुणबी प्रमाणपत्रे वितरित

CD
जिल्ह्यात १९ हजार ९६१ कुणबी प्रमाणपत्रे वितरित सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ६ ः कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी २४ ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे एकूण २० हजार १० अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी तब्बल १९ हजार ९६१ अर्ज मंजूर करून संबंधितांना जात प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. तर ३९ अर्ज त्रुटीत अडकली आहेत. शासनातर्फे जुन्या नोंदी शोधण्याची मोहीम राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्रशासनाने प्राप्त अर्जांवर वेगाने कार्यवाही करत बहुतांश अर्जांचा निपटारा केला आहे. दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तुलनेने किचकट असल्याचे चित्र आहे. संबंधित जुन्या नोंदी शोधणे, त्याआधारे वंशावळ तयार करणे, ती गावस्तरीय समितीसमोर सादर करणे, समितीकडून चौकशी करून अहवाल घेणे, त्यानंतर ‘आपले सरकार’ पोर्टलवरून अर्ज दाखल करणे, अशा विविध टप्प्यांतून अर्जदारांना जावे लागते. त्यामुळे या प्रकारचे अर्ज करण्यास नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्राप्त झालेले १० अर्ज सध्या प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. तसेच ज्यांच्या कागदपत्रांमध्ये कुणबीची थेट नोंद आढळते, त्यांनाही प्रमाणपत्राच्या पुढील पडताळणी प्रक्रियेत काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. काही प्रकरणांत पडताळणीदरम्यान प्रमाणपत्रे बाद होत असल्याने नागरिकांमध्येही प्रमाणपत्र काढण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. --- कायमस्वरूपी तोडग्याची मागणी कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी प्रमाणपत्रांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळत नसल्याचा, काही प्रमाणपत्रे पडताळणीमध्ये बाद होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सकल मराठा समाजाकडून कायमस्वरूपी तोडग्याची मागणी करण्यात येत आहे. ................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT