छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात १६ हजार ११० जणांना जात पडताळणी प्रमाणपत्र वाटप

CD
जात पडताळणी प्रमाणपत्रे दिली सोळा हजार ---- उदय सामंत ः ५७ लाख कुणबी नोंदी संकेतस्थळावर उपलब्ध --- छत्रपती संभाजीनगर, ता. ९ ः मराठवाड्यात ५७ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यापैकी आजवर ३,१७, ५६९ इतके कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातून ३,१६,९७७ जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत. याशिवाय जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दाखल झालेल्या २१,०५१ अर्जांपैकी १६,११० जणांना जात पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, अशी माहिती मराठा आरक्षणासंदर्भातील शिष्टमंडळातील मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना दिली. जात पडताळणी समिती, विभागीय आयुक्त यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत कुणबी प्रमाणपत्रांचे अर्ज, जारी केलेली प्रमाणपत्रे तसेच जात पडताळणी प्रमाणपत्रांचा आढावा सामंत यांनी शहरातील स्मार्ट सिटीच्या सभागृहात घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. मराठवाड्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून मराठा समाजाला कायदेशीर, टिकणारे आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर मराठवाड्यातील सापडलेल्या कुणबी नोंदी, आलेले अर्ज आणि दिलेली प्रमाणपत्रे याचा आढावा त्यांनी घेतला. मराठवाड्यात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आलेल्या अर्जांपैकी ६४ अर्ज नामंजूर करण्यात आली आहेत. ती का नामंजूर झाली याची माहिती आता अर्जदारांना देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीचा मराठवाडा दौरा ७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून, या अनुषंगाने विभागातील प्रशासनाशी समन्वय साधून आढावा घेण्यात येत आहे. हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासंदर्भातील अर्जांबाबत महाधिवक्त्यांचे कायदेशीर मत घेण्यात येणार आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूर गॅझेटियर लागू करण्याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचेही मंत्री सामंत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT