छत्रपती संभाजीनगर

कोकणातील गणेशभक्तांच्या सेवेसाठी २८१ बस रवाना

CD
मेन पान १ --- गणेशभक्तांसाठी ‘लालपरी’ धावली कोकणच्या वाटेवर -- बीडच्या ५३० पैकी २८१ बस कोकणात; स्थानिकांसाठी विद्यार्थी बस व ई-बसचा आधार ---- बीड, ता. ११ ः गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी बीडच्या ‘लालपरी’नेही कंबर कसली आहे. बीड एसटी विभागातील ५३० पैकी तब्बल २८१ बस, ५६२ चालक-वाहकांसह कोकणात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचा गावाकडचा प्रवास सुकर होणार असला, तरी बीड जिल्ह्यातील स्थानिक प्रवाशांसाठी उपलब्ध बसचा ताफा निम्म्यावर आला आहे. स्थानिक वाहतुकीवर ताण येऊ नये म्हणून विद्यार्थी बस, ई-बस आणि उपलब्ध साध्या बसच्या फेऱ्या वाढवून एसटी प्रशासनाने पर्यायी नियोजन केले आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि उपनगरांतून लाखो कोकणवासी आपल्या मूळ गावी जातात. या काळात होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून महिनाभरापूर्वीच आगाऊ आरक्षणाची (अ‍ॅडव्हान्स बुकिंग) सोय केली जाते. बीड एसटी प्रशासनाने तातडीने नियोजन करून २८१ सुसज्ज बस आणि त्यांना सांभाळण्यासाठी ५६२ चालक-वाहकांचे अनुभवी पथक कोकणात पाठवले आहे. ​बीड विभागात सध्या १०१५ चालक आणि ९३१ वाहक कार्यरत आहेत. यातील ५६२ चालक-वाहकांना कोकणातील घाटमार्गांवर सेवा देण्यासाठी पाठवण्यात आले आहे. --- बीड विभागाकडे उरल्या निम्म्याच बस, स्थानिक सेवेवर ताण ​बीड एसटी विभागाच्या ताफ्यात सध्या एकूण ५३० बस उपलब्ध आहेत. या ५३० पैकी २८१ बस थेट कोकणातील सेवेसाठी पाठवण्यात आल्यामुळे, सध्या बीड विभागात २४९ बस शिल्लक राहिल्या आहेत.​ सण-उत्सवाच्या काळात केवळ कोकणातच नव्हे, तर राज्यभरात प्रवाशांची मोठी गर्दी असते. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा मोठ्या शहरांतून अनेक नागरिक बीड जिल्ह्यात आपापल्या गावी येत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक मार्गांवर प्रवाशांचा ताण वाढला आहे. उपलब्ध बसची संख्या कमी झाल्याने ग्रामीण भाग आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांना काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. --- कोणत्या आगारातून किती बस रवाना बीड विभागातील सर्व आठही आगारांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये अंबाजोगाई आगार ४६, ​बीड आगार ४०, ​परळी आगार ३५, ​गेवराई आगार ३५, ​पाटोदा आगार ३५, ​धारूर आगार ३०, ​माजलगाव आगार ३०, ​आष्टी आगार ३० अशा ​एकूण २८१ बस सोडण्यात आल्या. अंबाजोगाई आगाराने सर्वाधिक बस पाठवल्या आहेत. --- विद्यार्थी बस आणि ई-बस आता सामान्य प्रवाशांच्या सेवेत ​स्थानिक प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बीड एसटी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभी केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात शाळा आणि महाविद्यालयांना सलग सुट्या असतात. या सुट्यांचा फायदा घेत प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या बस सामान्य प्रवाशांकडे वळवल्या आहेत. मानव विकास योजनेच्या ११ बस, ​शैक्षणिक/विद्यार्थी बस ४५ बस ​एकूण ५६ विद्यार्थी बस आता जिल्ह्यातील ग्रामीण मार्गांवर सामान्य प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीवर पडणारा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे. --- ​ई-बस आणि साध्या बसच्या फेऱ्यांमध्ये जोरदार वाढ ​बीड ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर आणि इतर प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या ई-बसच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. पुढील ८ ते १० दिवसांच्या काळात या ई-बस अतिरिक्त फेऱ्या मारणार आहेत. याशिवाय, शिल्लक असलेल्या साध्या बसच्या फेऱ्यांमध्येही ५० ते १०० ने वाढ करण्याचे नियोजन एसटी प्रशासनाने केले आहे; जेणेकरून स्थानकांवर गर्दी होणार नाही. --- कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड विभागातून २८१ बसचा ताफा ५६२ चालक-वाहकांसह रवाना करण्यात आला आहे. १० सप्टेंबरपासून या गाड्या सेवेत दाखल झाल्या आहेत. स्थानिक प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून उपलब्ध साध्या बस, ई-बस आणि विद्यार्थी बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच शेजारील विभागांशी समन्वय साधून अतिरिक्त फेऱ्या चालवण्यास सांगितले आहे. - किशनराव कान्हेळे, विभागीय वाहतूक अधिकारी, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : लक्ष्मण हाकेंचा अभिजीत दिपकेंना टोला; म्हणाले, ‘आधी...

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

SCROLL FOR NEXT