छत्रपती संभाजीनगर

जमिनीच्या वादातून चुलत्या पुतण्यात जबरदस्त हाणामारी पाच जण गंभीर जखमी.

CD
शेतीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात हाणामारी गंगापूर ः तालुक्यातील जुन्या कायगाव येथे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून चुलत्या-पुतण्यात झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले. शेख रहीम फतेह मोहम्मद व शेख निजाम फतेह मोहम्मद या भावांमध्ये बऱ्याच दिवसांपासून शेतजमिनीवरून वाद सुरू आहे. शेख रहीम यांच्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ९) सकाळी बैठक होऊन जमिनीच्या वाटणीचा वाद मिटवण्यात आला होता. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास पुतण्या सोहेल शेख निजाम व शाहरुख शेख हे संभाजीनगर येथील मित्रांसह तेथे पोहोचले आणि पुन्हा वाद उफाळला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात शेख सोहेल निजाम (वय ३०), शाहरुख सोहेल शेख, शेख रहीम फतेह मोहम्मद (वय ६५), शाहनवाज शेख रहीम (वय २८) आणि बुशराबी शेख रहीम (वय ६०) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रे यांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर सर्वांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाकडून गंगापूर पोलीस ठाण्यात ‘एमएलसी’ पाठवण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT