छत्रपती संभाजीनगर

शिवछत्रपती महाविद्यालयात भाषा ,वांड:मय आणि सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्घाटन

CD
भाषा, वाङ्‍मय आणि सामाजिक शास्त्र मंडळाचे उद्‍घाटन उत्साहात ----------- छत्रपती संभाजीनगर, ता. २१ ः शिवछत्रपती महाविद्यालयातील भाषा व वाङ्‍मय आणि सामाजिक शास्त्र मंडळ सुरू करण्यात आले आहे. याचे उद्‍घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सी.एस. पाटील होत्या. कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी भाषा व वाङ्‍मय मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे, वक्तृत्व, निबंधलेखन, काव्यवाचन, कथाकथन, वादविवाद आणि विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सामाजिक शास्त्र मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयामध्ये जागरूकता निर्माण करणे, समाजाभिमुख कार्यक्रम घेण्याची गरज असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची ग्वाही देण्यात आली. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संगीता राजमाने, उपप्राचार्य प्रा. भरत वहाटुळे, भाषा वाङ्‍मय मंडळाच्या अध्यक्ष प्रा. मनीषा पाठक, सामाजिक शास्त्रे मंडळाच्या अध्यक्ष डॉ. मनीषा राऊतमारे, डॉ. शाहू चव्हाण, प्रा. भारत शिरसाट, डॉ. सविता लोंढे, प्रा. हनुमान गाडे, डॉ. गहिनीनाथ वळेकर, डॉ. विश्वनाथ बोबडे, डॉ. अविनाश अंकुशराव, प्रा. गोपाळकृष्ण खोमणे, डॉ. सविता लोंढे आदींची उपस्थिती होती. डॉ. मनीषा राऊतमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. धनश्री डवाळकर यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. मनीषा पाठक यांनी आभार केले.

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; राजेंद्र शिंदेंची सहा तास चौकशी

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

SCROLL FOR NEXT