टुडे मेन करावी
LTR18HTP01.jpg लातूर ः येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे तेली गल्लीतील रस्त्यावरून वाहणारे पाणी.
---
कोसळधार पावसामुळे लातूरकरांना दिलासा
लातूर मंडळात ८५.५ मिमी; जिल्ह्यातील ६० पैकी ४२ मंडळांत पावसाची हजेरी
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. १८ ः चार महिने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या लातूरकरांना अखेर गुरुवारी (ता. १७) रात्री पावसाने दिलासा दिला. मध्यरात्रीनंतर वीजांच्या कडकडाटासह तब्बल अडीच ते तीन तास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर सखल भागात पाणी साचून अनेकांच्या घरांतही शिरले. लातूर मंडळात ८५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील ६० पैकी ४२ महसूल मंडळांत पावसाने हजेरी लावली. गेल्या महिनाभराच्या उघडिपीनंतर झालेल्या या पावसाने शहरातील जलस्रोतांच्या फेरभरणाला काहीसा हातभार लागण्यासह पावसाअभावी तग धरलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, रब्बी हंगामासाठी अद्याप आणखी दमदार पावसाची गरज कायम आहे.
जिल्ह्यासोबतच शहराकडे देखील पावसाने पाठ फिरवली होती. पण शुक्रवारी रात्री मात्र शहरात जोरदार पाऊस झाला आहे. वीजांच्या कडकडाटासह हा पाऊस झाला आहे. रात्री बारा वाजता पावसाला सुरवात झाली. एकच्या नंतर मात्र पावसाने जोर धरला. अडीच तीन तास जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ज्यांनी विंधन विहिरीचे फेरभरण केले आहे. त्यांच्यासाठी तर हा पाऊस चांगला झाला. आडीच तीन तास जोरदार पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पाणीच-पाणी झाले. यात गावा भागात, तेलीगल्ली तर एखाद्या नाला तुडूंब भरून वाहवा अशी परिस्थिती झाली. रस्त्यावर लावलेल्या गा़ड्या अर्ध्या पाण्यात असल्याचे चित्र दिसत होते. शहरात सखल भागात देखील पाणीच पाणी झाले होते. अनेकांच्या घरात पाणी गेले होते. महापालिकेचे पथक देखील रात्रभर कार्यरत राहिले.
---
लातूरसह काही मंडळा मोठा पाऊस
लातूरसह जिल्ह्यातील काही महसूल मंडळात जोरदार पाऊस झालाआहे. यात लातूरमध्ये ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ पळशी मंडळात ८०, रेणापूर ७९, बाभळगाव ५४, हरंगुळ ५७, चाकूर ५१, शेळगाव ५७, कासारबालकुंदा ५३, नळगीर ५२, औसा मंडळात ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांतील सर्वांत मोठा पाऊस राहिला आहे.
---
काही ठिकाणी पिकाला उपयुक्त
जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ६० पैकी ४२ मंडळांत पाऊस झाला आहे. पावसाअभावी खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. पण ज्या ठिकाणी हे पीक तग धरून आहे, त्या पिकासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे. रब्बीसाठी मात्र आणखी पावसाची गरज आहे.
---
जिल्ह्यात मंडळनिहाय पाऊस
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे आहे. लातूर मंडळात ८५.५, बाभळगाव ५४.८, हरंगुळ ५७.३, कासारखेडा ४२.३, मुरुड २०.३, गातेगाव ६.८, तांदूळजा २६, चिंचोली ८.३, औसा ५६, मातोळा ७.८, किनीथोट ११, उजनी १८, पानचिंचोली १३, औराद ३, कासारबालकुंदा ५३.५, अंबुलगा ५, मदनसुरी १६.५, कासारशिरसी ४.३, हलगरा ९.५, उदगीर २९.३, नागलगाव ३१.७, वाढवणा ३६.७, नळगीर ५२.६, मोघा २१.८, हेर ३७.७, , देवर्जन १७, तोंडार ३१, चाकूर ५१.६,वडवळ २२.९, शेळगाव ५७.६, झरी ३७.५, रेणापूर ७९, पोहरेगाव ३६, पानगाव १८, कारेपूर १७, पळशी ८०.६, देवणी १, बोरोळ १, वलांडी ६.३, शिरूर अनंतपाळ ४.५, साकोळ ५.५, हिसामाबाद ७, जळकोट ३.३, तर घोणसी मंडळात १५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.