छत्रपती संभाजीनगर

लातुरात कुरिअरच्या पार्सलमध्ये स्फोट

CD
LTR26B15515 लातूर ः येथील उमाटे कुरिअरच्या पार्सलमध्ये स्फोट झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलिस अधीक्षक मेघना आय.एन., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आदी. LTR26B15516 कुरिअरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले स्फोटाचे दृश्य. लातुरात कुरिअरच्या पार्सलमध्ये स्फोट - एक गंभीर जखमी; एअर पिस्टलच्या साहित्याचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ३१ ः येथील शिवाजीनगर भागातील कुरिअर सर्व्हिसेसच्या एका वाहनातून पार्सल खाली उतरवताना अचानक मोठा स्फोट झाला. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास घडली. दरम्यान, हा स्फोट एअर पिस्टलसाठी वापरल्या जाणाऱ्या कारटेजचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विलासराव देशमुख मार्गावर उमाटे इंटरनॅशनल कुरिअर सेवा आहे. वेगवेगळ्या कुरिअरचे पार्सल या दुकानात येतात. येथून शहरात वितरित केले जातात. शनिवारी (ता. ३१) सकाळी दहाच्या सुमारास या कुरिअर सेवेच्या (एमएच २४ बी डब्ल्यू ०३९१) या वाहनातून पार्सल खाली काढण्याचे काम सुरु होते. दरम्यान, नागनाथ स्वामी (वय ५२) यांनी एक पार्सल बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे फेकले, तेव्हा त्याचा मोठा स्फोट झाला. त्यात स्वामी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार करून सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. टप उडाले, काच फुटली दरम्यान, स्फोट झाल्यानंतर वाहनाच्या टपाचा काही भाग उडाला. वाहनात मागच्या बाजूला खड्डा पडला. आतमधील सर्व पार्सलच्या चिंधड्या उडाल्या. इतकेच नव्हे तर वाहनचालकाच्या समोरील मोठा काच तुटून बाहेर पडला. पोलिस यंत्रणा हालली या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर सर्व पोलिस यंत्रणा हलली. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस मंगेश चव्हाण, सहायक पोलिस अधीक्षक मेघना आय.एन., स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर आदी अधिकारी घटनास्थळी पोचले. तातडीने त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. एटीएस, बॉम्ब शोधक पथक या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने नांदेडचे एटीएसचे सहायक पोलिस निरीक्षक अवेज काझी, पोलिस संजय काळे, विष्णू पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यासोबतच येथील बॉम्ब शोधक पथक तसेच श्वान पथकाने देखील येऊन घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब शोधक पथकाने वाहनातील सर्व संशयित साहित्य बाहेर काढले. फॉरेन्सिक पथकाने देखील संशयित साहित्याचे सर्व नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. चार ते पाच तास ही सर्व पथके घटनास्थळावर तपास करीत होती. एअर पिस्टलच्या साहित्याचा स्फोट झाल्याचा अंदाज या पथकाने व्यक्त केला आहे. तरी सर्वच बाजूने तपास करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोट ---- उमाटे कुरिअरच्या पार्सलचा वाहनात झालेला स्फोट हा एअर पिस्टलसाठी वापरल्या जाणाऱ्या कारटेजचा असावा असा प्राथमिक अंदाज आहे. वाहनात काही एअर पिस्टल, छर्रे सापडले आहेत. २९ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून बंदूक घर या दुकानासाठी हे पार्सल आले होते. दोन दिवस ते उन्हात ठेवण्यात आले. तसेच आज देखील ते पार्सल बाहेर काढताना संबंधित व्यक्तीने ते फेकले. पार्सल उन्हात ठेवणे व घर्षणााने या कारटेजचा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे. या कारटेजमध्ये सीओटू गॅस असतो. यात एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. तर दुसरा किरकोळ जखमी आहे. हे पार्सल कोणी व कोणाला पाठवले याचाही तपास सुरू आहे. सर्व बाजूने या घटनेचा तपास करण्यात येत आहे. फॉरेन्सिक विश्लेषणासाठी देखील संशयित साहित्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. - अमोल तांबे, पोलिस अधीक्षक, लातूर शहरात झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या नागनाथ स्वामी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या चेहऱ्याला व हाताला मोठा मार लागला आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. - डॉ. हनुमंत किणीकर, प्रमुख, सह्याद्री रुग्णालय, लातूर -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT