छत्रपती संभाजीनगर

१३ दिवसांत लातुरात ११ ठिकाणी आग उष्णता वाढल्याने घटनांमध्ये वाढ; पाण्याची उपलब्धता कमी असल्याने अधिक सतर्क राहण्याची गरज

CD
मेन --- फोटो : लातूर : शहरात दुकानाला लागलेली भीषण आग. --- १३ दिवसांत लातुरात ११ ठिकाणी आग उष्णता वाढल्याने घटनांमध्ये वाढ; पाण्याची उपलब्धता कमी असल्याने अधिक सतर्क राहण्याची गरज --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १३ : यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जलसाठे कोरडे पडत आहेत. तर दुसरीकडे, ‘ऑक्टोबर हिट’मुळे लातूरकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. त्यातच आता शहरातच आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या १३ दिवसांत शहर व परिसरात चक्क ११ ठिकाणी आगीच्या लहान-मोठ्या घटना घडल्याची आकडेवारी समोर आली. घरगुती आणि व्यापारी भागात घडलेल्या या घटनांनी प्रशासनाची झोप उडवली आहे. काही दिवसांपूर्वी स्क्रॅप मार्केट रस्त्यावरील गोरक्षण कॉम्प्लेक्समधील दोन गोडाऊन आणि पाच दुकानांना भरदुपारी भीषण आग झाली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले होते. आकाशात धुराचे लोट पसरल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर गांधी मार्केटभागातील इलेक्ट्रीक दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली. यात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घराजवळ उभी केलेली चारचाकी गाडी जळून खाक होणे, पार्किंगमध्ये आगीची घटना घडणे अशा अनेक लहान-मोठ्या घटना या महिन्यांत सातत्याने घडताना दिसत आहेत. शहरात जून महिन्यात आगीच्या ११ घटना, जुलै महिन्यात ७ घटना, ऑगस्ट महिन्यात ७ घटना, सप्टेबर महिन्यात ३ घटना घडल्याचे अग्निशामक दलाने सांगितले. मात्र, ऑक्टोबर महिन्यात १३ दिवसांतच आगीच्या ११ घटना घडल्या आहेत. सुदैवाने, यात एकही जीवितहानी झाली नाही. पण आगीच्या घटना वाढत असल्याने आणि दुष्काळामुळे पाण्याची उपलब्धता कमी असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन अग्निशामक दलातर्फे करण्यात आले आहे. --- चौकट फायर ऑडिट करून घ्या सध्या तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सियसपर्यंत पोचले आहे. उष्णता वाढत असल्याने एसी, कुलर, पंखे याचा वापर घरोघरी वाढला आहे. त्यातच गीझर, फ्रीज हेही घरोघरी वापरले जाते. घरातील वीज यंत्रणेवर अधिक ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी. घरातील विद्यूत उपकरणांची, शेगडीची वेळेवर देखभाल-दुरूस्ती करावी. मोठ्या सोसायट्या आणि व्यावसायिक इमारतींनी फायर ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन प्रभारी अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव यांनी केले. --- जोड आहे

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT