LTR26B15599 लातूर : शहरात रविवारी मध्यरात्री फटाक्यांमुळे घरातला लागलेली आग.
-----
एकाच रात्री शहरात आगीच्या आठ घटना
----
लाखोंचे नुकसान; फटाके काळजीपूर्वक फोडण्याचे महापालिकेचे आवाहन
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ९ : लक्ष्मीपूजनादिवशी फटाके फोडण्याची परंपरा आहे. पण, फटाक्यांचा वापर काळजीपूर्वक झाला नाही, तर दुर्घटनाही घडतात. म्हणून शहरात एकाच रात्री आगीच्या आठ घटना घडल्या. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, फटाके काळजीपूर्वक फोडण्याचे आवाहन महापालिकेच्या अग्निशामक दलातर्फे सोमवारी (ता. नऊ) करण्यात आले.
शहरात रविवारी (ता. आठ) लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सायंकाळी साडेसहापासून शहरात विविध भागांत फटाक्यांच्या आतषबाजीला सुरवात झाली. त्यानंतर गंजगोलाई भागातील लोखंड गल्ली येथील विशाल पेंट या दुकानाला आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला आला. रात्री साडेआठला पहिली घटना घडली. त्यानंतर एकामागून एक अशा आठ घटना घडल्याने आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाची मोठी धावपळ झाली. सुभाषनगर, संविधान चौक, गूळ मार्केटजवळील कचरा संकलन केंद्र, पाच नंबर चौकातील खुल्या प्लॉटवरील कचरा व टाकाऊ वस्तूला आग लागल्याची घटना घडली. आग पसरू नये यासाठी तातडीने अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोचली.
ट्यूशन एरिया परिसरतील कीर्ती गोल्डच्या गोडाऊनला आणि एमआयडीसी परिसरातील डीलक्स फुटवेअर कंपनीला रात्री उशिरा मोठी आग लागली. येथील आग आटोक्यात आणण्याचे काम सुरूच असताना अंबा हनुमान परिसरातील एका घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या सर्व ठिकाणी वेळेवर मदत पोचवून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे कार्य सुरू होते. त्यामुळे जीवितहानी टळली.
----
स्वत:ची दिवाळी साजरी न करता पथक घटनास्थळी
अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद शिंदे, रोहित बनकर, अविनाश कराडे, सागर पवार, सुजित कल्याणकर, गिरीश वानखेडे, पल्लवी पवार, मोहन महले, शरद माने, राहुल भोये, प्रवीण खरसे, अमोल वाघमोडे, वैभव अवरगंड, सोमेश नवगिरे, बाळासाहेब पवार, रोहित सुरजुसे, काशिनाथ म्हाके, संजय चंडले, जावेद शेख, शशिकांत पाटील, बाबू सय्यद, नीलेश बुरपल्ले, विकास इंगोले, मुकुंदा देशमुख, सचिन राठोड, पंकज गायकवाड, संदेश वाढवणे, आकाश पवार, सुधाकर भिल हे पथक स्वत:च्या घरातील दिवाळीचा आनंद साजरा न करता रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी कार्यरत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.